अनेक देशांमध्ये युद्धात मोठ्या प्रमाणात सैनिक शहीद होत असतात. परंतु असा एक देश आहे, जिथे आजपर्यंत युद्धात एकही सैनिक शहीद झालेला नाहीये. तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
जगातील अनेक देश हे आपल्या शूर सैनिकांच्या बलिदानासाठी ओळखले जातात. कोणत्या ना कोणत्या देशात युद्धात सैनिक शहीद झाले आहेत.
मात्र, स्वित्झर्लंड असा एक देश आहे. जिथे एकाही सैनिकाला युद्धात आपला जीव गमवावा लागला नाही.
पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल. परंतु यामागे स्वित्झर्लंडचे अद्वितीय लष्करी आणि परराष्ट्र धोरण आहे. ज्यामुळे जगातील इतर देशांपेक्षा वेगळे आणि विशेष बनले आहे.
1815 मध्ये व्हिएन्ना काँग्रेसनंतर युरोपातील प्रमुख राष्ट्रांनी स्वित्झर्लंडला तटस्थ राष्ट्र म्हणून घोषित केले. म्हणजे स्वित्झर्लंडने वचन दिले की ते कोणत्याही लष्करी संघर्षात अडकणार नाहीत.
या धोरणामुळे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांसारख्या मोठ्या संघर्षांतही स्वित्झर्लंडने आपल्या सीमा बंद ठेवल्या आणि या युद्धांपासून स्वत: ला दूर ठेवले होते.
स्वित्झर्लंडमध्ये एक अतिशय मजबूत आणि आधुनिक सैन्य दल आहे. जो अंतर्गत सुरक्षा आणि राष्ट्रीय संरक्षणासाठी नेहमी सज्ज असतो.
लष्करी दलांना थेट युद्धात गुंतवण्याऐवजी शांतता आणि रणनीतिच्या माध्यमातून समस्या सोडवणे हे तिथल्या सरकारचे धोरण आहे.