Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेता ओंकार भोजनेनं या मालिकेला रामराम करून बराच वेळ झाला असला तरी आजही प्रेक्षकांमध्ये हास्यजत्रेसाठी ओळखला जातो. त्यानं ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी त्यानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडली पण हा कार्यक्रम जास्त दिवस सुरु राहिला नाही. यानंतर पुन्हा एकदा शोमध्ये येण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी विनंती केली. त्यावरून आता प्रेक्षकांनी त्याला गद्दार म्हटले आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ साठी ओळखला जातो ओंकार भोजने.
ओंकारनं ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रेला’ रामराम केला होता.
ओंकारनं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रेला’ रामराम केल्यानं त्याचे चाहते नाराज झाले होते.
नम्रता संभेररावनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ओंकार आणि प्रसाद खांडेकर यांच्यासोबत फोटो शेअर केला होता.
नम्रतानं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत नेटकरी म्हणाला, “ओंक्या तू गद्दार आहेस…तू तुझ्या सगळ्या चाहत्यांबरोबर गद्दारी केलीस. आम्ही सगळे तुला खूप मिस करतो. हास्यजत्रा हा शो का सोडलास, निदान निमिशसारखं एखाद्या स्किटसाठी तरी तू यायला हवं. एकदा परत नक्की ये…आम्हाला सर्वांना तुला पुन्हा हास्यजत्रेत पाहून खूप आनंद होईल.”
ओंकारसाठी केलेली ही कमेंट पाहता नम्रता म्हणाली, “प्रत्यक्षात असं काहीच नाही, त्याला नव्या गोष्टी शिकायच्या होत्या म्हणून त्यानं त्याचा मार्ग निवडला. आम्ही सर्वांनी त्याच्या निर्णयाचा आदर करत त्याला सहकार्य केले.”
महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडण्यावर ओंकारनं कारण देत 'हातात काही चित्रपट आहेत आणि त्यासोबत मध्यंतरी आजारी होतो' हे सांगितलं होतं. (All Photo Credit : namrata sambherao/ Onkar Bhojane Fan Page Instagram)