PHOTOS

देशातील एकमेव शहर जिथे रिक्षाने फिरण्यासाठी काढावं लागतं तिकीट, 73 वर्षांपूर्वीची सिस्टीम आजही होते फॉलो

बस, ट्रेन आणि फ्लाईटमधून प्रवास करताना तुम्ही तिकीट काढलं असेल पण तुम्ही कधी रिक्षातून प्रवास करताना तिकीट काढलंय का? विश्वास बसत नाही पण हे अगदी खरं आहे. पण हे एकदम खरं आहे. 73 वर्षांपूर्वीची सिस्टीम इथे आजही फॉलो होते. 

Advertisement
1/8

रिक्षा प्रवासासाठी तिकिट लागणारं हे शहर  उत्तराखंडमध्ये आहे. त्याचे नाव नैनिताल असं असून येथील सुंदर दऱ्या, तलाव आणि हिरवेगार दृश्य लोकांना मोहित करतं. शहरातील ही अनोखी परंपरा सर्वांना आश्चर्यचकित करते.

2/8

तुम्ही रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालकाला थेट पैसे दिले असतील, पण नैनिताल शहरात तुम्हाला तिकिटासाठी थेट पैसे द्यावे लागत नाहीत, तर तुम्हाला तिकीट खरेदी करावे लागते. ही परंपरा नैनितालच्या ऐतिहासिक वारशाचा एक भाग मानली जाते.

 

3/8

मीडिया रिपोर्ट्सनुसार 1942 पासून हँड रिक्षा नैनीतालमध्ये धावण्यास सुरुवात झाली. कालांतराने, हँड रिक्षाची जागा पॅडल रिक्षा आणि ई -रिक्षाने घेतली. परंतु रिक्षाचं स्वरूप बदललं असलं तरी तिकीट प्रणाली मात्र तीच आहे. नैनीतालमध्ये लोक लांब रांगा लावून तिकीट घेता. ही प्रणाली 1952 मध्ये सुरु झाली.

 

4/8

नैनीतालच्या मालरोडमधील मल्लीताल आणि तल्लीताल दरम्यानच्या प्रवाश्यांसाठी या रिक्षा धावतात. याशिवाय शहरात या रिक्षांना परवानगी नाही. दोघांमधील अंतर सुमारे 1.2 किलोमीटर आहे. जेथे लोक तिकिटे घेऊन रिक्षा प्रवास करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याचे भाडे सध्या 15 रुपये असून याची किंमत 20 रुपये करावी अशी मागणी होत आहे. 

5/8

आज सुद्धा मालरोडमध्ये प्रवास मल्लीताल आणि तल्लीताल दरम्यान रिक्षा प्रवास करण्यासाठी तिकीट घेण्याकरता लांब रांगा लावतात. 

6/8

सर्वात खास गोष्ट म्हणजे हे तिकीट हाताने लिहावं लागतं. ज्यात रिक्षाचा क्रमांक आणि भाडं लिहिलेलं असतं. 

7/8

खाण्यापिण्यापासून ते खरेदी आणि तिकिटांपर्यंत ... आजच्या डिजिटल युगात लोक प्रत्येक काम ऑनलाइन करतात, परंतु नैनीतालमधील रिक्षा तिकिटांची प्रणाली अजूनही हाताने चालू आहे.

 

8/8

नैनीतालमधील रिक्षासाठी तिकिटे घेण्याची ही प्रणाली पर्यटकांना आकर्षित करते. बरेच लोक त्यांच्याबरोबर संस्मरणीय म्हणून तिकिट देखील घेतात. या व्यतिरिक्त, हे शहराचा वारसा, शिस्त आणि पर्यटनाची संस्कृती देखील दर्शविते.

 





Read More