PHOTOS

पाकिस्तानने जो एअर बेस उडवल्याचा दावा केला तिथेच अचानक पोहोचले PM मोदी अन्...; पाहा Photos

PM Modi At Indian Air Base After Operation Sindoor: कोणतीही पूर्वसूचना न देता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी एअर बेसवर आल्याचं पाहून सैनिकांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. पुढे काय घडलं ते आपण फोटोंमधून पाहूयात...

Advertisement
1/11

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानची पोलखोल केली आहे. मात्र यावेळेस ते थेट सैनिकांना भेटायला गेले. नक्की घडलंय काय पाहूयात या काही खास फोटोंमधून....

2/11

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी पंजाबमधील अधमपूर एअर बेसवर जाऊन हवाई दलाच्या जवानांची भेट घेतली.

3/11

अचानक एअर बेसवर पंतप्रधानांना पाहून सर्वच जवानांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी मोदींबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी केली. 

4/11

मोदींनी अधमपूर एअर बेसवर काढलेले फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. 

5/11

एअर बेसवरील हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचं अधमपूर एअर बेसवर स्वागत केलं. 

6/11

हवाई दलाच्या विशेष विमानाने पंतप्रधान मोदी अधमपूर एअर बेसवर पोहचले. पाकिस्तानवर 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत भारताने केलेल्या हल्ल्यांमध्ये या एअरबेसवरुन विमानांनी उड्डाण केलेलं.

7/11

मोदींनी जवांनाबरोबर मनमोकळेपणे गप्पा मारल्या. मोदींबरोबर बोलण्यासाठी जवानांनी त्यांच्याभोवती गर्दी केल्याचं दिसून आलं.

8/11

मोदींनी हात जोडून सर्व जवानांचं अभिमान आणि प्रेम स्वीकारलं

9/11

मोदींनी पाठीवर थाप मारत शब्बासकी देत हवाई दलाच्या जवानांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. 

10/11

मोदींनी जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत 'भारत माता की... जय' अशा घोषणाही दिल्या. विशेष म्हणजे याच एअरबेसला आम्ही उद्धवस्त केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मोदींनी या एअरबेसला भेट देऊन पाकिस्तानच्या दावाच्या हावाच काढून टाकली.

11/11

जवानांचा निरोप घेताना मोदींनी कारमध्ये बसण्याआधी कारच्या दारात उभा राहून निरोप घेतला तेव्हा सर्वच जवानांनी हात उंचावून मोदींना टाटा केलं.





Read More