ओपो रेनो 12 प्रोवर तुम्हाला भरघोस डिस्काऊंटदेखील मिळतोय.
Oppo Reno 12 Pro Huge Discount: मोबाईल घ्यायचा विचार करत असाल तर ओपो तुमच्यासाठी रेनो 12 प्रो घेऊन आलाय. यावर तुम्हाला भरघोस डिस्काऊंटदेखील मिळतोय.
Oppo च्या या 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच फुल HD+ डिस्प्ले आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 2412 x 1080, स्क्रीन ते बॉडी रेशो 93.5 टक्के, रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 240Hz आणि पीक ब्राइटनेस 1500Nits आहे.
हा स्मार्टफोन दोन प्रकारात येतो. बेस व्हेरिएंट 12GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेजसह टॉप व्हेरिएंटमध्ये 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज मिळेल.
फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 50MP टेलिफोटो लेन्स आहे. मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह येतो.
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफीसाठी, प्रो, पोर्ट्रेट, नाईट, एक्स्ट्रा एचडी, स्लो मो असे मोड त्याच्या मागील बाजूस आहेत. फोनमध्ये ड्युअल व्ह्यू व्हिडिओ मोड आहे.
Oppo Reno 12 Pro फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Octa-Core प्रोसेसर आहे. Android 14 वर आधारित ColorOS 14.1 वर हँडसेट चालतो.
Oppo च्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट असून फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस आयडीचे फिचर्सदेखील आहे.
ओपो रेनो 12 Pro ची किंमत 36 हजार 999 रुपये आहे. फोनच्या टॉप वेरिएंटची किंमत 40 हजार 999 रुपये आहे. हा स्मार्टफोन स्पेस ब्राउन आणि सनसेट गोल्ड या दोन रंगांत उपलब्ध आहे.
तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी केला तर तुम्हाला सर्वात वर 3500 रुपयांची सूट मिळत आहे. ही ऑफर सर्व बँक कार्डद्वारे पेमेंटवर असेल.