काही महिन्यांपूर्वी धोनीचा ट्रॅक्टर चालवताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. ते फोटोशूट नसून धोनी खरंच शेतात काम करत असतानाचा व्हिडिओ होता.
जवळपास 3 वर्षापूर्वी एम.एस धोनीने धुर्वा येथे सेंबो फॉर्म हाउसमध्ये शेती आणि डेअरीचं काम सुरु केलं होतं. आता येथे भाज्यांची शेती देखील होत आहे.
रांचीच्या होलसेल बाजारात पकड बनवण्यासाठी धोनी सध्या कमी दरात भाजी विक्रीला पाठवत आहे. फळ मार्केटपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या धोनीच्या कियोस्कवर या भाज्या विकल्या जात आहेत.
माहितीनुसार, सध्या बाजारात कोबी 10 रुपये प्रति किलो तर टोमॅटो 30 रुपये किलोने विकले जात आहेत. होलसेलमध्ये घेतल्यास ते आणखी स्वस्त मिळतात. त्यामुळे बाजारात या भाज्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी धोनीने मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातून 2 हजार कडकनाथ (Kadaknath) कोंबड्या मागवल्या होत्या. लवकरच बाजारात वाटाणे, स्ट्रॉबेरी आणि कडकनाथ कोंबडीचे अंडे देखील धोनीच्या फार्ममधून उपलब्ध करण्यात येणार आहे.