OTT platforms Web Series : पाहिली नसेल तर आताच पाहा आणि वीकेंड खऱ्या अर्थानं Enjoy करा... ही वेब सीरिज कोणती माहितीये?
OTT platforms Web Series : काही वेब सीरिज इतक्या लोकप्रिय होत आहेत, की प्रेक्षक ती वारंवार पाहण्यालाही पसंती देताना दिसत आहेत. या साऱ्या वेब सीरिजच्या विश्वात भारतातील पहिलीवहिली वेब सीरिज कोणती होती तुम्हाला माहितीये?
अतिशय साधंसुधं कथानक, तिकीच विनोदी आणि कायम आपलीशी वाटणारी पात्र आणि त्यांच्यामध्ये असणारं सुरेख नातं असं एकंदर चित्रण या वेब सीरिजमध्ये करण्यात आलं होतं.
भारतातील पहिली वेब सीरिज म्हणून या कलाकृतीकडे आजही पाहिलं जातं आणि ती काही वर्षांआधी प्रदर्शित होऊनही आजसुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. या वेब सीरिजचं नाव आहे, 'पर्मनंट रुममेट्स'.
अभिनेता सुमीत व्यास आणि अभिनेत्री निधी सिंह यांनी या सीरिजमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. या जोडीला मिळून चाहते 'तन्केश' असं म्हणतात.
'पर्मनंट रुममेट्स' या वेब सीरिजचा पहिला सीझन 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सीझनला 50 मिलियन व्ह्यूज मिळाले होते.
आतापर्यंत या सीरिजचे तीन भाग आले असून पहिले दोन भाग तुम्ही झी5 आणि तिसरा भाग अमेझॉन प्राईमवर पाहू शकता.
सुमितनं या सीरिजमध्ये 'मिकेश' आणि निधीनं 'तान्या' या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. एका तरुण जोडप्याच्या नात्याभोवती या सीरिजचं कथानक फिरतं.
फक्त मिकेश आणि तान्याच नव्हे, तर त्यांच्या नात्यातील इतर पात्रही या सीरिजमध्ये जीव ओततात. सहकलाकारांच्या कमाल भूमिका आणि त्यांनी या भूमिकांसाठी घेतलेली मेहनत पाहता ही सीरिज प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी राज्य करून आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.