Bollywood Movies Banned In Pakistan: बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत ज्यांचे कथानक पाहून पाकिस्तानने थेट बंदी घातली. या चित्रपटांचा प्रभाव इतका होता की पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डने त्यांना प्रदर्शित होण्यापासून थांबवले. तर पाहूयात असे कोणते चित्रपट आहेत, ज्यांनी पाकिस्तानची चिंता वाढवली.
काश्मीरमधील पहलगाममध्ये घडलेल्या हत्याकांडामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप उसळला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष कधीच पूर्णपणे थांबलेला नाही. जेव्हा जेव्हा संबंध सुधारण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा काही ना काही घडून पुन्हा दुरावा निर्माण झाला. आज आपण अशा काही बॉलिवूड चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांच्या कथानकामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आणि ज्यावर तिथल्या सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली. पाहूया कोणकोणते आहेत हे चित्रपट.
सलमान खान आणि कतरिना कैफचा हा थरारक चित्रपट पाहून पाकिस्तान अस्वस्थ झाला. कारण यात भारतीय रॉ आणि पाकिस्तानी आयएसआय एजंटमधील प्रेमकथा दाखवली गेली होती. आयएसआयच्या उल्लेखामुळे पाकिस्तानने या चित्रपटावर बंदी घातली.
2016 मध्ये आलेला आमिर खानचा 'दंगल' हा चित्रपट प्रचंड गाजला. मात्र, यात भारतीय झेंडा आणि राष्ट्रगीत दाखवण्यात आल्यामुळे पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने या दृश्यांवर आक्षेप घेतला. आमिरने हे बदल नाकारल्यामुळे चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली.
मेघना गुलजारच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला आलिया भट्टचा 'राझी' चित्रपट भारतात सुपरहिट ठरला. यात एका भारतीय महिला गुप्तहेराची कथा आहे जी पाकिस्तानमध्ये जाऊन माहिती गोळा करते. ही कथा पाकिस्तानला न पटल्याने त्यांनी चित्रपटावर बंदी आणली.
सनी देओल आणि अमिषा पटेलचा 'गदर' हा चित्रपट फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात भारत-पाकिस्तानमधील तणाव दाखवला गेला होता. त्यामुळे पाकिस्तानने या चित्रपटालाही आपल्या देशात प्रदर्शित होऊ दिले नाही.
धनुष आणि सोनम कपूरचा 'रांझणा' हा चित्रपट एका हिंदू मुलाच्या मुस्लिम मुलीवरील प्रेमकथेवर आधारित आहे. या कथानकामुळे पाकिस्तानने या चित्रपटाबर बंदी आणली.
सोनम कपूरच्या 'नीरजा' चित्रपटावरही पाकिस्तानने आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले की चित्रपटात वास्तव चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. हा चित्रपट नीरजा भनोटच्या शौर्यगाथेवर आधारित होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले होते.
अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' महिलांच्या आरोग्यविषयक मुद्द्यांवर आधारित होता. मात्र, पाकिस्तानने या विषयाला त्यांच्या संस्कृतीशी चुकीचा ठरवत चित्रपटावर बंदी घातली.
सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या 'फँटम' या चित्रपटातील काही संवादांमुळे पाकिस्तान चिडला. 2015 मध्ये आलेल्या या चित्रपटावरही तिथे बंदी घालण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते.