Pandharpur Bhakta Niwas Booking Fraud: पंढरपूरमध्ये देवदर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण पंढरपूरमध्ये भाविकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात...
पंढरपूरमध्ये भक्तांच्या फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नक्की घडलंय काय पाहूयात...
पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनास येणाऱ्या भाविकांची फसवणूक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बनावट भक्त निवास संकेत स्थळावरून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.
भक्त निवासाच्या नावाखाली फसवणूक करण्याच्या उद्देशाने https://shrivitthalrukminibhaktaniwas.in नावाने बनावट संकेतस्थळ निर्माण करण्यात आलं आहे. यावरुनच फसवणूक केली जात आहे.
या वेबसाईटवरुन बनावट बुकींग करुन 9045033719 क्रमांकावर भक्त निवासात खोली आरक्षित करण्यासाठी आगाऊ रक्कम घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
ज्या भक्ताबरोबर हा प्रकार घडला त्यानेच दाखल केलेल्या तक्रारीनंतर अशी फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली.
पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये रुममसाठी बुकींग करण्याच्या अधिकृत वेबसाईटचाच वापर करण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे.
पंढरपूरमधील भक्त निवासमध्ये बुकींग करण्यासाठी https://yatradham.org संकेतस्थळाचा वापर भाविकांनी करण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे.