PHOTOS

मुलं हट्टी झाली, उलटून बोलतात? फक्त 'या' गोष्टी करा, मुलांचा स्वभाव सुधारेल

Parenting Tips in Marathi: मूल ऐकतच नाही, अमुक एक ऐकायचं असेल तर तमुक गोष्ट कर असं करुन पालकांना वेठीस धरले जाते. हल्ली प्रत्येक पालकांची एकच तक्रार असते ती म्हणजे, मुलं ऐकतचं नाही, हट्टीपणा करतात... मुलांना चांगली शिस्त आणि सवयी लागाव्यात यासाठी काय करायला हवं हे अतिशय कॉमनपणे विचारले जाणारे प्रश्न... 

Advertisement
1/7

मुलं हट्टीपणा करायला लागले की नेमके काय करायचे हे पालकांना समजत नाही. मुलांचा हट्टीपणा काही प्रमाणात का होईना कमी होण्यासाठी तुम्ही पालक म्हणून काही गोष्टी निश्चितच करु शकता. 

2/7
तुमच्यातील संवांद महत्त्वाचा
तुमच्यातील संवांद महत्त्वाचा

पालक आणि मुलं यांच्यामध्ये संवांद असणं फार महत्त्वाचे आहे. अशावेळी जरी मुलाने काही गोष्टींसाठी हट्टीपणा केला, तर त्यावेळी गोडबोलून त्या गोष्टीपासून त्याला दूर ठेवा. जर पालक किंवा घरातील कोणतीही गोष्ट मागितली तर लगेच आणून देऊ नका.

3/7
मागेल ते लगेच मिळेल असे नका
मागेल ते लगेच मिळेल असे नका

अनेकदा कामाच्या गडबडीत आपण छोटी छोटी कामे आपण मुलांना सांगतो, आणि म्हणतो तू हे काम केलस तर मी तुला अमुक गोष्ट देईन. अशावेळी नकळत आपण त्यांना समोरच्याचे ऐकल्यावर काहीतरी मिळते अशी सवय लागते. 

4/7
हट्ट पुरवायला मर्याद ठेवा
हट्ट पुरवायला मर्याद ठेवा

मुलाचे कोणते हट्ट पुरवायचे आणि कधी याला काही मर्यादा घालून घ्या. बऱ्याचदा आपल्या लहानपणी आपल्याला मिळाले नाही म्हणून आपल्या मुलाला त्याने सांगितले की लगेच द्यायला हवं यावंर थोडं नियंत्रण  ठेवा. 

5/7
पर्याय द्या
पर्याय द्या

तुला एखादी गोष्ट मिळेल पण लगेच नाही, त्या ऐवजी तुम्ही त्यांच्यासाठी वेगळं काय करु शकता हे त्यांना सांगा. त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केलात तर त्यांचा हट्ट कमी व्हायला नक्कीच मदत होईल. 

 

 

6/7
जबरदस्ती करु नका
जबरदस्ती करु नका

जर तुम्ही तुमच्या मुलांवर कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करत असाल तर त्यांचा स्वभाव बंडखोरी होऊन जातो. हीच सवय त्यांना पुढे जाऊन हट्टी बनवू शकते.  

7/7
मुलांचे आधी नीट ऐका
मुलांचे आधी नीट ऐका

जर तुम्हाला वाटतं असेल की तुमच्या हट्टी मुलांनी तुमचे ऐकावे तर यासाठी तुम्हाला आधी लक्ष देऊन मुलांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. मुलं जर हट्ट करत असतील तर शांतपणे आणि थोड धीर ठेवून त्यांचे म्हणणे ऐकूण घ्यावे आणि त्यांचे बोलणे पूर्ण होईपर्यंत त्यांना मध्ये तोडू नका.





Read More