Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Venue: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या जगप्रसिद्ध हॉटेल लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलास मध्ये 23 आणि 24 सप्टेंबरला विवाहाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
उदयपूरच्या जगप्रसिद्ध हॉटेल लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलास मध्ये 23 आणि 24 सप्टेंबरला विवाहाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.
हॉटेल लीला पॅलेस आणि द ओबेरॉयमध्ये 200 हून अधिक पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 50 हून अधिक मनोरंजन आणि राजकारणातील व्हीव्हीआयपी गेस्ट सहभागी होण्याची शक्यता आहे.
बुकिंगनंतर आता दोन्ही हॉटेल्समध्ये सर्व कार्यक्रमांची तयारी सुरु करण्यात आली आहे.
या लग्नात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हजेरी लावणार आहेत. याशिवाय प्रियांका चोप्रा पती निकसह उपस्थित असेल.
हॉटेलमधील सूत्रांच्या माहितीनुसार, 23 सप्टेंबरला उदयपूरमध्ये हळदी, मेहंदी आणि संगीतचा कार्यक्रम पार पडणार आहे. लग्नानंतर गुरुग्राम येथे रिसेप्शन पार पडणार आहे.
या दोन हॉटेल्सव्यतिरिक्त जवळच्या 3 हॉटेल्समध्ये बुकिंग करण्यात आली आहे. लिला पॅलेसमध्ये विवाहाचे कार्यक्रम पार पडणार असून, पाहुण्यांच्या राहण्याची सोय उदयविलास हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
हॉटेल द लिला पॅलेसमध्ये एका रात्रीचं भाडं 30 हजार ते 9 लाखांपर्यंत आहे.
या लक्झरी हॉटेलमध्ये ग्रँड हेरिटेज गार्डन व्ह्यू रुमचं भाडं जवळपास 30 हजार रुपये असून, महाराजा सूटचं एका रात्रीचं भाडं 9 लाख रुपये आहे. म्हणजेच टॅक्स वैगेरे मिळून हे भाडं 10 लाख होतं.
जवळपास 2 महिन्यांपूर्वी राघव आणि परिणीती यांनी उदयपूरमध्ये येऊन हॉटेल्सची पाहणी केली आहे. 13 मे रोजी दिल्लीत राघव आणि परिणीती यांचा साखरपुडा पार पडला होता.