Parineeti Chopra IS Pregnant: परिणीती चोप्रा कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये पोहोचली होती. या दरम्यान, तिच्या पतीने एक आनंदाची बातमीचे संकेत दिले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये नुकतीच तिचा पती राघव चढ्ढासोबत पोहोचली होती. या शोमध्ये राघवने एक आनंदाची बातमी दिली आहे.
कपिलशी झालेल्या संभाषणादरम्यान राघव चढ्ढाने परिणीती कधी आई होणार? यावर उत्तर दिले आहे. काय म्हणाले राघव चढ्ढा? पाहूयात सविस्तर
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. परिणीती तिच्या सौंदर्याने नेहमी चाहत्यांना आकर्षित करत असते.
नुकतीच ती तिचा पती राघव चढ्ढासोबत द ग्रेट इंडियन कपिल शो या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी कपिलसोबत बोलताना राघव यांनी पत्नी परिणीती आई होणार असल्याचे म्हणाले.
मात्र, जेव्हा राघव चढ्ढा याबद्दल बोलले तेव्हा परिणीतीचे भाव जरा थोडे वेगळे वाटत होते. तिला कुठेतरी धक्का बसल्यासारखे वाटत होते.
कपिल शोमध्ये सांगत होता की गिन्नी घरी आल्यानंतर त्याची आई कुटुंब नियोजनाबाबत सावध झाली. तिने कपिलला बाळाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला होता.
यावर राघव चढ्ढा म्हणाले की, मी ते तुला देईन. मी लवकरच तुलाआनंदाची बातमी देईन. परिणीतीच्या प्रतिक्रिया खूप संमिश्र होत्या.
यावेळी कपिलने काही चांगली बातमी येत आहे का? लाडू वाटायला सुरुवात करावी का? यावर राघव चढ्ढा म्हणाले देऊ. यानंतर सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.