Parineeti-Raghav Wedding Card : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि निलंबित खासदार राघव चढ्ढा यांची लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
परिणीती आणि राघव एकमेकांसोबत अनेक वेळा स्पॉट झाल्यानंतर त्यांनी प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर मे महिन्यात दिल्ली साखरपुडा केला.
या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता हे दोघे लवकरच म्हणजे येत्या 23 आणि 24 सप्टेंबरला ते विवाहबंधनात अडकणार आहेत.
या जोडप्याने लग्नासाठी राजस्थानमधील उदयपूरची निवड केली आहे. लीला पॅलेस आणि द ओबोरॉय उदयविलास इथे लग्नाचे कार्यक्रम होणार आहेत.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या कार्डवर असं लिहिण्यात आलं आहे की, 'श्री पीएन चड्ढा जी आणि श्रीमती उषा आणि सचदेवा, अलका आणि सुनील चढ्ढा तुम्हाला आमच्या मुलगा राघव आणि परिणीती यांच्या रिसेप्शन लंचसाठी आमंत्रित केलंय.'
या कार्डवर रिसेप्शनची तारीख देण्यात आली आहे. या दोघांचं रिसेप्शन 30 सप्टेंबरला ताज चंदीगड इथे होणार आहे. व्हायरल झालेलं कार्डबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
साखरपुड्यानंतर साधारण 2 महिन्यांपूर्वी राघव आणि परिणीती हे उदयपूरला स्पॉट झाले होते.