al : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने भारताला दुसरं पदक मिळवून दिलंय. 10 मीटर सिंगल पिस्टल प्रकारात मनूने कांस्यपदक जिंकलं होतं. अशातच आत...
अंतिम फेरीत, मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी वोंहो ली आणि ये जिन ओह यांचा 16-10 असा पराभव केला अन् कांस्य पदकावर नाव कोरलं.
मनू भाकरने मिश्रमध्ये देखील पदक जिंकून इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली.
तर ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकणाऱ्यांच्या दिग्ग्जांच्या यादीत मनू भाकरने मानाचं स्थान कमवलं आहे. मनूच्या खात्यात एकूण दोन पदकांची नोंद झालीये.
त्याआधी, कुस्तीपटू सुशील कुमारने 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं. तर 2012 मध्ये सुशीलने रौप्यपदक पटकावलं होतं.
तर पीव्ही सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं.