Auto News Bike : मुळत बाईक घेणं, ती सुस्साट पळवणं, मनमुराद फिरणं ही अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, त्या बाईकचा सांभाळ करणं, तिची काळजी घेणं हीसुद्धा महत्त्वाची बाब.
तुम्ही बाईक चालवता का? चालवत असाल तर एखाद्या प्रसंगी ती पार्क करायची झाली किंवा कुठे थांबायचं झालं तर तुम्ही काय
बाईक स्टँडवर लावता. त्यातही तुम्ही बाईक सिंगल किंवा साईड स्टँडवरच ठेवता का?
ही सवय आताच बदला. कारण, बाईक सिंगल स्टँडवर ठेवण्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. या सवयीमुळं इंधनाचा दाब दोन इंजेक्टरवर येतो ज्यामुळं बाईकमधून इंधनगळती सुरु होते.
इंमोबिलाइज इंजिन असणाऱ्या बाईकमध्ये ही अडचण सर्वाधिक दिसून येते जिथं इंधन वाया जाण्यासोबतच बाईकच्या मायलेजवर याचा परिणाम होतो.
जेव्हा बाईक एका स्टँडवर उभी केली जाते तेव्हा ती एका बाजुला पडण्याचा सर्वाधिक धोका असतो. अशा परिस्थितीत बऱ्याचदा बाईकच्या Parts चं नुकसान होतं.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की बाईकचा साईड स्टँड चेसिसशी जोडलेला असतो. त्यामुळं ती जेव्हा साईड स्टँडवर उभी असते तेव्हा तिचा चेसिस खराब होऊ लागतो. यामुळं बाईकचा तोलही जाऊ लागतो.
तुम्ही कोणत्याही पार्किंगमध्ये बाईत उभी करता तेव्हा ती सिंगल स्टँडला लावल्यास तिला तिथं अपेक्षेहून जास्त जागा लागते. त्यामुळं शेजारून कोणतं वाहन बाहेर काढायचं झाल्यास त्यांच्या किंवा तुमच्या वाहनाला नुकसान पोहोचू शकतं.