रेल्वे प्रशासनाकडून लोकांना ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी काही नियम आणले आहेत. रात्री 10 नंतर प्रवास करताना तुम्हाला देखील पुढील नियम माहिती असायलाच पाहिजेत. जाणून घ्या सविस्तर
भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था आहे. मोठ्या प्रमाणात लोक भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात.
भारतीय रेल्वे ही दररोज प्रवाशांसाठी हजारो गाड्या चालवते. ज्यावेळी प्रवाशांना खूप लांबचा प्रवास करावा लागतो. त्यावेळी लोक ट्रेनला जास्तीत जास्त पसंती देतात.
यामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक वेगवेगळ्या सुविधा मिळतात. त्यामुळे त्यांचा रेल्वे प्रवास देखील खूप सोयीचा होतो.
अशातच रात्री 10 नंतर प्रवास करण्याबाबत अनेक लोकांना चिंता असते. मात्र, भारतीय रेल्वेने लोकांना प्रवास करण्यासाठी काही नियम आणले आहेत.
जर तुम्ही देखील ट्रेनने प्रवास करत असाल तर रात्री 10 नंतर तुम्ही ट्रेनमध्ये मोठ्याने बोलू शकत नाही. असे केल्यास प्रवासी तुमच्या विरोधात तक्रार दाखल करू शकतात.
रात्री 10 नंतर ट्रेनमध्ये कैटरिंग सर्विस मिळत नाही. जर तुम्हाला काही खायचे असेल तर तुम्ही ते अधीच खाऊ शकता किंवा त्याआधी तुम्ही ऑर्डर करू शकता.
तसेच ट्रेनमध्ये उपस्थित असणारा टीटीई रात्री 10 नंतर तुमचे तिकीट तपासू शकत नाहीत. मात्र, जर कोणी 10 नंतर प्रवास सुरु केला असेल तर त्याचे तिकीट तपासले जाते.