Personality Test : प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यासोबत त्याच्या शरीराच्या अवयवांचा आकारही त्याच्या व्यक्तिमत्वाचे रहस्य उघड करतात.
जेव्हा एखादी व्यक्ती नकारात्मक काही बोलत असेल तर आपण म्हणतो ना तुझ्या जिभेला हाड नाही का? तुमची ही जिभ तुम्ही सांभाळून वापरा कारण जिभेच्या आकारावरुन तुमच्या मनात आणि डोक्यात काय सुरु आहे, याचं रहस्य उघड होतं.
तुमची जीभ लांब आणि पातळ असेल तर तुम्ही बुद्धिमान आणि खूप हुशार आहात. तुम्ही कठीण प्रसंगांवरही सहज मात करता.
तुमची जीभ लहान आणि जाड असेल याचा अर्थ तुम्ही थोडे भावनिक आहात. तुम्ही लोकांशी खूप चांगले वागता आणि तुमचं वागणं सोपं असतं.
जिभेच्या आकारासोबत तिचा रंगही बरंच काही सांगून जातं. तुमची जीभ लाल असेल तर तुम्ही निरोगी आणि भरपूर उर्जेने भरलेले आहात.
तुमच्या जिभेचा रंग पिवळा असले तर तुम्ही कायम थकलेले आणि आजारी राहता. काम करण्याचा तुम्हाला आळस येतो. तुम्ही सतत काम पुढे ढकलता.
अगदी क्वचित लोकांच्या जिभेचा रंग हा काळा असतो. असे व्यक्ती हे कामात मग्न असतात. कितीही मेहनत केली तरी त्यांच्या त्रास कमी होत नाही. करिअरच्या बाबतीत ते अस्थिर असतात. कोणतेही काम योग्यरित्या होत नाही.
काही लोकांच्या जिभेचा रंग सारखा नसतो, म्हणजेच मिश्र रंगाचा असतो. थोडा लाल आणि पिवळसर असा दिसतो. अशी लोक नियम तोडण्यात पटाईत असतात. त्यांना नियम अजिबात आवडत नाही. त्यांना अनेक आजारपण होत असतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)