एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे त्याच्यासोबत काही काळ व्यतित केल्याशिवाय कळत नाही. पण तुम्हाला माहितीये का व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज त्याच्या देहबोलीवरुन येतो.
एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्यावरुनही त्याचा स्वभाव व त्यांच्या अंगी असलेले कलागुण याचा अंदाज बांधता येतो. आज आम्ही तुम्हाला याबाबतच सांगणार आहोत.
काही जणांचा अंगठा हा अगदी सरळ असतो त्याला थोडादेखील बाक नसतो. अशा लोकांचा स्वभाव म्हणजे ते सरळ साध्या स्वभावाचे असतात. त्यांच्यात आत्मविश्वास असतो. तसंच, इमानदार व निष्ठावान असतात.
ज्या व्यक्तींचा अंगठा मागच्या बाजुला झुकलेला असतो वा अत्यंत लवचिक असतो असे लोक कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेतात. परंतु, या लोकांच्या स्वभावातील दोष म्हणजे ते हलक्या कानाचे असतात.
ज्या व्यक्तींचा अंगठा कठोर असतो असे लोक स्वभावानेदेखील कठोर असतात. मात्र, त्यांचे मन स्वच्छ असते तसंच, ते स्पष्टवक्ते असतात. मात्र, कधी कधी ते या स्वभावामुळं समोरच्याला नकळत दुखावतात
काही लोकांचा अंगठा खूपच मृदू असतो. अशा लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नेहमी सकारात्मक असतो. यामुळं त्यांची कायम प्रगती होत असते. तसंच, नेहमी यशस्वी ठरतातय
काही जणांची बोटं लांबसडक असतात अशी लोकं दिसायला आकर्षक असतात तसंच, कुशाग्र बुद्धीचे असतात. त्यांच्यात नेतृत्वाचे गुण असतात
ज्या व्यक्तींचा अंगठा लहान असतो असे लोक कलाक्षेत्राशी जोडलेले असतात. त्यांच्याकडे मित्रांची कमतरता नसते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)