Petrol Diesel Price Today in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 5 ते 10 रुपयांना कमी होऊ शकतात.
कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळात असून WTI क्रूड प्रति बॅरल $ 72.85 वर विकले जात आहे. तर त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 77.88 वर व्यापार करत आहे.
देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले असून आज (18 जानेवारी 2024) महाराष्ट्रात पेट्रोल (Petrol-Diesel Price) आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
महाराष्ट्रात आज (Today Petrol Diesel Price) पेट्रोलचा दर 1.21 रुपयांनी तर डिझेलचा दर 1.17 रुपयांनी वाढला आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोलच्या दरात 60 पैशांनी तर डिझेलच्या दरात 59 पैशांनी वाढ झाली आहे. तसेच उत्तर प्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश आणि गोव्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत.
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. तर ठाण्यात पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर आहे.
पुण्यात पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर तर नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर कोल्हापूर मध्ये पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर, कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर पाहायला मिळत आहे.
पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.