Petrol Diesel Price Today : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेला महागाईतून दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करुन सर्वाजनिक इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात दोन रुपयांनी कपात केली. जाणून घ्या आजचे दर
राज्यात इंधनाचे दर जाहीर झाले असून आज आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूडच्या किंमती 0.06% च्या घसरणीसह प्रति बॅरल $82.68 ने विकले जात आहे.
परिणामी महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागात इंधनाच्या दरात बदल झाला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे.
मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 104.21 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे 92.51 रुपये प्रति लिटर इतके आहे.
पुण्यात पेट्रोलच्या किंमती 104.08 रुपये तर डिझेलच्या किंमतीत 90.61 रुपये इतका आहे.
नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत 103.96 रुपये आणि डिझेलची किंमत 90.52 रुपये प्रति लिटर एवढी आहे.
नाशिकमध्ये आज पेट्रोलची 104.68 रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल 91.19 रुपये प्रति लिटर इतकं आहे.
छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 106.69 रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल 93.45 रुपये प्रति लिटरने मिळतंय.