Petrol Diesel Price Today in Maharashtra: आज 23 एप्रिल रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले. देशात दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचेन नवे दर जाहीर करतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त की महाग हे जाणून घ्या...
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल 82 डॉलर प्रति बॅरल दराने विकले जात आहे. WTI कच्च्या तेलाची किंमत 81.56 डॉलर आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घ्या.
मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.21 रुपये तर डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे.
पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 103.69 रुपये तर डिझेलचा दर 90.23 रुपये प्रतिलिटर आहे.
नाशिकमध्ये पेट्रोल 103.80 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर प्रतिलिटर 90.34 रुपये आहे.
नागपुरात पेट्रोलचा दर 103.99 रुपये तर डिझेलचा दर 90.55 रुपये प्रतिलिटर आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 104.34 रुपयांना विकले जाते. डिझेल 90.86 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकार नवीन योजना तयार करत आहे. जे लवकरच स्वस्त होणार आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी इतर प्रमुख अर्थव्यवस्थांशी समन्वय साधण्यासाठी भारत एक धोरणात्मक तेल काढण्याच्या योजनेवर काम करत आहे.