एटीएममधून किती आणि कसे पैसे काढता येतील? कधीपासून सुरु होणार सुविधा? EPFO ने याबाबत काही नियम केले आहेत का? याबद्दल जाणून घेऊया.
PF Account Money Withdraw Through ATM: कोणतीही यंत्रणा सुरू केल्यावर सुरुवातीला त्यात काही त्रुटी असतात ज्या हळूहळू वेळ आणि गरजेनुसार दूर केल्या जातात. तसेच, तंत्रज्ञानाची भर घालून अनेक गोष्टी खूप सोप्या केल्या आहेत. त्यात अनेक गोष्टींचा समावेश आहे, त्यातील एक म्हणजे पीएफ.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO पुढील वर्षापासून पीएफ खातेधारकांना एक नवीन सुविधा देणार आहे. यामध्ये खातेदार जसे बँक खात्यातून पैसे काढू शकतील तसे एटीएममधून त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतील.
पण ही सुविधा नेमकी कधीपासून सुरु होणार? एटीएममधून किती पैसे काढता येतील? EPFO ने याबाबत काही नियम केले आहेत का? याबद्दल जाणून घेऊया.
केंद्रीय कामगार सचिव सुमिता डावरा यांनी अलीकडेच एटीएममधून पीएफचे पैसे कधी काढता येणार याची माहिती दिली आहे. यासंबंधीचे हार्डवेअर अपडेट केले जात आहे. तुम्हाला जानेवारी 2025 पासून बदल दिसू लागतील.
जानेवारी महिन्यापासून पीएफ खातेधारकांना एटीएममधून पैसे काढता येणार असल्याचे मानले जात आहे.जास्तीत जास्त मार्च 2025 पर्यंत एटीएम आणि ईवॉलेट प्रक्रिया सुरु होईल, असे सांगण्यात येत आहे.मात्र याबाबत अद्याप कोणतीही निश्चित मुदत देण्यात आलेली नाही.
विभागाकडून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला खातेदार त्याच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी केवळ 50 टक्के रक्कम एटीएममधून काढू शकणार आहे. मात्र ही रक्कम भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पीएफ खातेधारकांसाठी नवीन सुविधा सुरू झाल्यानंतर कर्मचारी, लाभार्थ्यांना त्यांचे पीएफचे पैसे एटीएममधून काढता येणार आहेत. सुरुवातीला तुम्ही तुमच्या खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी फक्त 50 टक्के रक्कम एटीएममधून काढू शकाल.
जर एखाद्या पीएफ खातेदाराचा मृत्यू झाला तर नॉमिनी एटीएममधून पैसे काढू शकेल.मृत सदस्यांच्या कुटुंबाला EDLI योजनेंतर्गत 7 लाख रुपयांचा विमा मिळेल. तुम्ही ते पैसे एटीएममधून देखील काढू शकाल.