zation (EPFO) ही एक सरकारी संस्था आहे, जिथं कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक बाबींची तरतूद करण्यात आलेली असते. कंपनीकडून मिळणाऱ्...
तुम्हीही जर नोकरी करताय तर या खात्यामध्ये नेमकी किती रक्कम आहे हे जाणून घेऊ शकता. कसं? ते पाहा...
EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही रक्कम पाहू शकता. यासाठी तिथं तुम्ही फक्त Universal Account Number (UAN) देणं गरजेचं आहे. हा एक 12 आकड्यांचा क्रमांक असतो. हा नंबर टाईप केल्यानंतर सुरु होणाऱ्या विंडोवर तुम्ही "For Employees"वर क्लिक करणं अपेक्षित आहे. इथून तुम्ही "Member Passbook" या पर्यायावर या.
तुम्ही ईपीएफओच्या अॅपवरूनही पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता. यासाठी तुम्ही सर्वप्रथम EPFO वर नोंदणी करून तिथं तुमचा युएएन नंबर लिंक करणं अपेक्षित असेल. ही सध्याच्या घडीला सर्वाधिक वापरात असणारी पद्धत आहे.
आणखी एक सोपी पद्धत म्हणजे 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवून रक्कम पाहणं. इथं तुम्ही UAN आणि बँक अकाऊंट नंबरमधील शेवटचे चार आकडे इतकी माहिती देणं अपेक्षित असतं. पण, यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक पीएफ खात्याशी लिंक असेल याची काळजी घ्या.
Umang app या इंटिग्रेटेड सरकारी अॅपमधूनही तुम्ही पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता. इथंसुद्धा युएएन क्रमांत तुमची मोठी मदत करणार आहे. त्यामुळं पीएफ खात्यात किती रक्कम आहे, हे एकदा पाहूनच घ्या.