PHOTOS

Photos: महिंद्रांनी 20 लाख रुपयांची इलेक्ट्रीक कार 'या' खेळाडूच्या आई-बाबांना केली गिफ्ट

Anand Mahindra Gifted XUV400 EV To This Player: आनंद महिंद्रांनी मागील वर्षी यासंदर्भातील घोषणा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली होती आणि त्यानंतर काही महिन्यांमध्येच त्यांनी आपला शब्द खरा करुन दाखवला आहे. या खेळाडूनेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा खेळाडू आणि कशासाठी आनंद महिंद्रांनी एवढी महाग कार त्याला गिफ्ट केली...

Advertisement
1/9

महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फारच सक्रीय असतात. अनेकदा ते मनोरंजक फॅक्ट्सबरोबरच आपल्या मनातील भावना सोशल मीडियावरुन व्यक्त करतात. अगदी क्रिकेटपासून सिनेमापर्यंत आणि देशात घडणाऱ्या घडामोडींपासून ते ऑटोमोबाईल क्षेत्रातील अपडेट्सबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्हाला आनंद महिंद्रांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सहज पाहायला मिळतात. टेक सेव्ही उद्योजकाबरोबरच आनंद महिंद्रांची आणखीन एक ओळख म्हणजे त्याचा दानशूरपणा. 

 

2/9

मागील वर्षी भारतीय बुद्धीबळपटू प्रज्ञानंदच्या कुटुंबाला एक खास भेट देण्याची घोषणा केली होती. आनंद महिंद्रांनी प्रज्ञानंदच्या पालकांना एक्सयुव्ही 400 ईव्ही कार भेट देण्याची घोषणा केलेली. 

 

3/9

प्रज्ञानंदने एफआयडीईच्या वर्ल्डकप फायनलमध्ये पोहचणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. हा संपूर्ण देशासाठी आणि सर्वच भारतीयांसाठीही फार अभिमानाचा क्षण होता.

4/9

याच प्रज्ञानंदने शुक्रवारी आनंद महिंद्रांचे आभार मानत एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये प्रज्ञानंदने आनंद महिंद्रांनी त्यांचा शब्द पाळत आपल्या पालकांना इलेक्ट्रीक एसयूव्ही 400 भेट दिल्याचं सांगितलं आहे.

5/9

"एक्सयूव्ही 400 मिळाली. माझ्या पालकांना फार आनंद झाला आहे. आनंद महिंद्रा सर धन्यवाद!," अशी कॅप्शन प्रज्ञानंदने फोटो शेअर करत दिली आहे.

 

6/9

आनंद महिंद्रांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रज्ञानंदसंदर्भात एक पोस्ट केली होती. त्यात प्रज्ञानंदची आई त्याच्याकडे फार अभिमानाने पाहताना दिसत होती. यावर एका चाहत्याने कमेंट करुन प्रज्ञानंदला तुम्ही महिंद्रा थार दिली पाहिजे, असं म्हटलं होतं. 

 

7/9

आनंद महिंद्रांनी यावर प्रतिक्रिया देताना थार नाही पण त्याच्या पालकांना एसयुव्ही 400 इलेक्ट्रीक कार भेट देऊ इच्छितो. त्यांनी ज्यापद्धतीने मुलाला पाठिंबा दिला आणि त्याला या स्तरापर्यंत घेऊन आले त्यामुळे त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे, असं म्हणत आनंद महिंद्रांनी ही विशेष भेट देण्याची घोषणा केली.

 

8/9

आनंद महिंद्रांनी आपला शब्द पाळला असून नुकतीच या कारची चावी प्रज्ञानंदच्या पालकांच्या हातात महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोपवली. 

 

9/9

आनंद महिंद्रांनी प्रज्ञानंदच्या पालकांना भेट दिलेल्या एक्सयुव्ही 400 ईव्हीची किंमत किमान 15 लाख 49 हजारांपासून सुरु होते. म्हणजे टॅक्सचा विचार केल्यास या गाडीची किंमत 17 लाखांहून अधिकच आहे. प्रज्ञानंदला देण्यात आलेली एक्सयूव्ही टॉप व्हेरिएंट असल्याची समजते. या गाडीची किंमत 20 लाख रुपयांहून अधिक आहे.

 





Read More