Tesla Experience Centre In India at BKC Mumbai: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या एक्सपीरियन्स सेंटरमधील खास फोटो पाहूयात...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील पहिल्या 'टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर’ चे उदघाटन केले.
टेस्लाच्या वरिष्ठ विभागीय संचालक इसाबेल फॅन या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.
फडणवीस यांच्या खात्यावर या 'टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर’मधील काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
टेस्लाच्या या सेंटरमध्ये फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या कारचा लूक लॉन्च करण्यात आला.
इसाबेल फॅन यांनी भारतासाठी टेस्लाचा दृष्टिकोन आणि प्रस्तावित प्रमुख नवकल्पनांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली.
टेस्ला इंडियाच्या या पहिल्या एक्सपीरियन्स सेंटरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका मांडताना गुंतवणुकीसंदर्भात काय नियोजन आहे हे सांगितलं.
फडणवीस यांनी स्वत: या कारमध्ये बसून कारची सविस्तर माहिती घेतली.
इसाबेल फॅन यांनी फडणवीस यांना कारची सविस्तर माहिती दिली.
विशेष म्हणजे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील या सेंटरवरील नावाची पाटी मराठीत असल्याचं व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.
2016 पासून भारतात सेंटर सुरु करण्याचा टेस्लाचा मानस तब्बल 9 वर्षानंतर यशस्वी झाला.
लवकरच या 'टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर’मधून टेस्ला कार्सची विक्री केली जाणार आहे.
टेस्ला कार भारतामध्ये 60 लाख रुपयांना उपलब्ध होणार आहे. ही कारची बेस प्राइज असणार असून ही किंमत अमेरिकेतली किंमतीपेक्षा 15 लाखांनी अधिक आहे. (सर्व फोटो फडणवीसांच्या एक्स हॅण्डलवरुन)