Maharashtra Vidhan Sabha Election Voting Photos: लोकशाहीचा उत्सव! अक्षय पासून सचिन पर्यंत सेलिब्रिटींनी बजावला मतदानांचा हक्क. आज महाराष्ट्रात मतदान पार पडत आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान होत आहे.
आज राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील नागरिक सकाळी सात वाजल्यांपासून मतदानासाठी रांगेत उभे आहेत. कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. तसंच, नागरिकांना मतदान करण्याचं अवाहन केलं आहे.
भारतरत्न सचिन तेंडुलकर यानेही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. पत्नी अंजली आणि मुलगी सारासह त्याने मतदानकेंद्रात जावून मतदान केले आहे.
अक्षय कुमार यानेदेखील आज मतदान केले आहे. तसंच, नागरिकांनी मतदान करावं, असं अवाहन केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांनी लातूरच्या बाबळगाव या त्यांच्या मुळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
कार्तिक आर्यन यानेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याने फोटोही पोस्ट केला आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी देखील मतदान केले आहे.
अभिनेता सुबोध भावे याने पुण्यात मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याने ओक पोस्टदेखील शेअर केली आहे. मी फलटण ला शूट करतोय . काल रात्री उशिरा काम संपल्यावर पुण्यात पोचलो. आज सकाळी सगळ्यात लवकर जाऊन मतदान केलं आणि पुन्हा फलटणला शूटिंगसाठी पोचलो. (सांगायचा उद्देश मी किती भारी, किंवा मतदान केलं म्हणजे काय उपकार केले का?किंवा किती पैसे मिळाले पोस्ट टाकायचे? अशा येणार्या उत्साहवर्धक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून....) आपल्या सर्वांना नम्र विनंती करण्यासाठी ही पोस्ट. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची मुदत आहे. न विसरता मतदान करा, असं त्याने म्हटलं आहे.
रेणुका शहाणे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट केला आहे.