Devendra Fadnavis Photos From Davos: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेले फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. फडणवीसांनी शेअर केलेले काही खास फोटो पाहूयात...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वित्झर्लंडमधून शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंमधील अजंठा कनेक्शन चांगलेच चर्चेत आहे. नेमकं काय आहे हे कनेक्शन आणि फोटो शेअर करताना फडणवीसांनी काय म्हटलंय पाहूयात...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसमधील अंतरराष्ट्रीय परिषदेसाठी परदेश दौऱ्यावर आहेत.
पहिल्या दिवसाचे फोटो असं म्हणत फडणवीसांनी स्वत:चे काही फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये युरोपीयन शहरात फडणवीस असल्याचं अधोरेखित होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दावोसमधील इंडिया पॅव्हेलियन येथील महाराष्ट्राच्या प्रोमेनेड येथे आगमन झालं तो क्षण!
फडणवीसांनी स्वत:चे बर्फाच्छादित बॅकग्राऊण्डवरील काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंना फडणवीसांना, "बर्फाच्छादित रस्ते अन् स्पष्ट दृष्टीकोन... उद्योगांसाठी मिळेलेली संधी साधताना" अशा अर्थाची कॅप्शन दिली आहे.
फडणवीसांनी कग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार एस यांचीही दावोसमध्ये भेट घेतली.
उद्योगमंत्री उदय सामंतही या दौऱ्यामध्ये फडणवीसांसोबत आहेत. ते सुद्धा या भेटीगाठींमध्ये सहभागी झालेले.
उद्योजक आणि अभिनेता विवेक ओबोरॉयही दावोसमधील अंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये फडणवीसांना भेटला.
फडणवीस यांनी होरॅसीस या अंतरराष्ट्रीय थिंक टँकचे अध्यक्ष डॉ. फ्रँक रिस्टर यांची भेट घेतली.
होरॅसीस या अंतरराष्ट्रीय थिंक टँकचे अध्यक्ष डॉ. फ्रँक रिस्टर यांना फडणवीसांनी अजिंठ्यातील लेण्यांमध्ये कोरण्यात आलेल्या प्रतिमेची प्रतिकृती भेट म्हणून दिली.
स्वित्झर्लंडमध्येही फडणवीसांची क्रेझ दिसून आली. अनेकांनी सेल्फीसाठी त्यांच्याभोवती गर्दी केली.
फडणवीसांचे दावोसमधील फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. हे फोटो एखाद्या चित्रपटातील वाटत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.