आज राखीपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी, राजकारण्यांनी हा सण साजरा केला. (फोटो साभारः ANI)
पंतप्रधान अनेक सणसमारंभांंमध्ये लहान चिमुकल्यांची भेट घेतात. त्यांना निराश न करता त्यांच्यासोबत काही वेळ व्यतीत करतात. (फोटो साभारः ANI)
2017 साली विधवा स्त्रिया आणि शाळकरी मुलांंसोबत राखीपौर्णिमेचा सण साजरा केला होता. (फोटो साभारः ANI)
रामनाथ कोविंदांनी चिमुकल्यांची भेट घेऊन त्यांंना आशिर्वाद दिले. (फोटो साभारः ANI)
ट्विटरच्या माध्यमातून रामनाथ कोविंद यांंनी देशवासियांना राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा, त्यांचा आत्मसन्मान जपणारा समाज बनवायचा आहे. असंं नातं आपल्या समाजात निर्माण होवो अशा भावना व्यक्त केल्या आहेत. (फोटो साभारः ANI)
राष्ट्रपती भवानामध्ये खास चिमुकल्यांंसाठी रक्षाबंधनाचा सण आयोजित केला होता. रामनाथ कोविंद यांना शाळकरी मुलांंनी राखी बांधली. (फोटो साभारः ANI)
सुषमा स्वराज यांंनी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. (फोटो साभारः ANI)