Prime Minister Modi In Shree Kalaram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून झाली. नाशिकमधील काळाराम मंदिराच्या आवारात पंतप्रधान मोदींचं यापूर्वीही कधीही न पाहिलेलं रुप पाहायला मिळालं. पाहूयात काही खास फोटो...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मोदी नाशिकमधील ओझर विमानतळावर दाखल झाले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचं नाशिक विमानतळावर स्वागत केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.
नाशिकमध्ये मोदींचा एक रोड शो सुद्धा झाला.
पंतप्रधान मोदींबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही एकाच गाडीतून उपस्थितांना अभिवादन करत प्रवास करत होते.
पंतप्रधान मोदीही मांडी घालून टाळ वाजवताना रामभक्तीत तल्लीन झाले.
काळाराम मंदिरामध्ये विशेष किर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या किर्तनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले.
सर्वसामान्य भाविकाप्रमाणे पंतप्रधान मोदी टाळ वाजवण्यात दंग झाले होते.
मोदींनी टाळ वाजवून झाल्यानंतर मनोभावे देवाचं दर्शन घेतलं.
काळाराम मंदिरामध्ये टाळ वाजवून राम भक्तीत तल्लीन झालेले पंतप्रधान मोदी एका तासाने पुढील दौऱ्यासाठी निघाले.