पंतप्रधान मोदी राजपथ वर पोहोचल्यावर लोकांमध्ये उत्साह दिसला. त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात एसपीजी अधिकारी इकडे-तिकडे धावपळ करताना दिसले. (सौजन्य : पीआयबी)
पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्यांना आवरताना सुरक्षा रक्षकांना मेहनत घ्यावी लागली.
समारंभावेळी पंतप्रधान मोदी आपल्या खास अंदाजात सर्वांना अभिवादन करण्यास राजपथ येथे आले. उपस्थित जनता मोदींची झलक पाहण्यास उस्तूक होती.
काही खास क्षणांवेळी आपल्या पेहरावामुळे चर्चेत असणाऱ्या पंतप्रधान मोदींचा आजचा पेहरावही वेगळा होता. पंतप्रधानांनी आज सलग चौथ्या वेळेस पगडी घातली.
६९ व्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर आयोजित सोहळ्यात १० देशांचे प्रमुख आणि शासनाध्यक्ष उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परेड सुरू होण्याआधी अमर जवान ज्योती वर देशासाठी शहिद जवानांना श्रद्धांजली दिली.