PHOTOS

18 वर्षांनंतर PM मोदी गिरमध्ये, Photo काढताना अचानक समोर उभा ठाकला सिंह अन्...

PM Modi Lion Safari: देशाचे पंतप्रधान गिर इथं पोहोचताच अभयारण्य व्यवस्थापनाच्या वतीनं त्यांना जंगल सफारीवर नेण्यात आलं. याच सफारीचे काही खास क्षण वृत्तसंस्थेनं सोशल मीडियार शेअर केले... 

Advertisement
1/8
गुजरात दौरा
गुजरात दौरा

PM Modi Lion Safari: गुजरात दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गिर अभयारण्य गाठलं. जिथं त्यांनी आशियाई सिंहांना अगदी जवळून पाहिलं. 

2/8
जंगलच्या राजाचे फोटो
जंगलच्या राजाचे  फोटो

जंगलाच्या सफरीवर गेलं असता पंतप्रधानांनी अभयारण्यात मुक्त वावर करणाऱ्या या जंगलच्या राजाचे काही फोटोसुद्धा आपल्या खास कॅमेरामध्ये टीपले. एएनआय या वृत्तसंस्थेनं मोदींच्या या खास दौऱ्यातील फोटो शेअर केले. 

 

3/8
सिंहांचा सर्वात मोठा अधिवास
सिंहांचा सर्वात मोठा अधिवास

आशियाई सिंहांचा सर्वात मोठ्या अधिवासांपैकी एक अशा या गिर अभयारण्यामध्ये जंगल सफारीदरम्यान क्षणाक्षणाला या प्राण्याला इतकं जवळून पाहताना पंतप्रधानही भारावून गेले. 

4/8
पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

गिरमधील या खास सफरीदरम्यान पंतप्रधान मोदी अगदी कमाल पोषाखात पाहायला मिळाले. जंगल सफारीसाठी सहसा पसंती जिलं जाणारं कॅमोफ्लज शर्ट, त्यावर जॅकेट, सफारीची हॅट असा त्यांचा लूक होता. 

 

5/8
जिप्सीतून सफारी
जिप्सीतून सफारी

सूर्योदयापासूनच पंतप्रधान गिरच्या या अभयारण्यामध्ये जिप्सीतून सफारीसाठी निघाले होते. यावेळी त्यांनी या जंगलाची कैक रुपं आपल्या नजरेसह आपल्या कॅमेरामध्येही कैद केली. 

 

6/8
प्रोजेक्ट लायन
प्रोजेक्ट लायन

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार देशात आशियाई सिंहांच्या संरक्षणासाठी 'प्रोजेक्ट लायन' अंतर्गत केंद्राच्या वतीनं 2900 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. 

 

7/8
वनतारा
वनतारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी गुजरात दौऱ्यावर पोहोचले.  रविवारी सकाळी जामनगरमधील वनतारा येथे त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते सासन गिर राष्ट्रीय उद्यानाला पोहचले. 

8/8
पंतप्रधानांचे फोटो
 पंतप्रधानांचे फोटो

सोशल मीडियावर पंतप्रधानांचे हे फोटो बरेच व्हायरलही झाले आहेत. याच निमित्तानं आतापर्यंत पंतप्रधानांनी भेट दिलेल्या काही अद्वितीय ठिकाणांच्या यादीत आता गिरचंही नाव जोडलं गेलं आहे.  (सर्व छायाचित्र- एएनआय)

 





Read More