Port Blair New Airport: शंखाच्या आकाराचं विमानतळ आजपासून भारतीयांच्या भेटीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या विमानतळाचे उद्घाटन पार पाडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अंदमान-निकोबारच्या पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्धाटन केलं आहे. 710 कोटी रुपये खर्चून हे विमानतळ बांधण्यात आलं आहे. या विमानतळामुळं क्रेंदशासित प्रदेशांचा संपर्क वाढेल.
जवळपास 40,800 चौरस मीटर एकूण बिल्ट अप क्षेत्रासह नवीन विमानतळावर दरवर्षी जवळपास 50 लाख प्रवासी हातळण्यास सक्षम असेल.
पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून दोन बोईंग - 767-400 आणि दोन एअरबस-321 या प्रकारांच्या विमानांसाठी उपयुक्त असे एप्रनदेखील बांधण्यात आले आहेत.
वीर सावरकर विमानतळावर एकाच वेळी १० विमान उतरु शकतात. तसंच, या विमानतळाचा आकार निसर्गाची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला आहे. समुद्र आणि द्विप यांची सांगड घालण्याचा प्रय़त्न केला आहे. विमानतळाची रचना शंखाप्रमाणे बांधण्यात आली आहे.
वीर सावरकर विमानतळामुळं केंद्र शासित प्रदेशांतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं म्हटलं जातं.
या विमानतळाची खासियत म्हणजे उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी डबल इन्सुलेटेड छत बसवण्यात आलं आहे. नैसर्गिक सूर्यप्रकाशासाठी जास्तीत जास्त प्रकाश येण्यासाठी प्रकाश व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे.