Office Scheme How Much You Will Get If You Do The Same: पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या संपत्ती विवरणपत्रामध्ये पोस्टाच्या योजनेमध्ये ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच वाराणसी मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळेस पंतप्रधानांनी आपल्या उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीचं विवरण दिलं आहे. मोदींनी कुठे कुठे आर्थिक गुंतवणूक केली आहे याची माहिती सादर केली. मोदींच्या या गुंतवणुकीमध्ये पोस्टाच्या एका योजनेचाही समावेश आहे. मोदींनी नेमकं कोणत्या योजनेमध्ये पैसा गुंतवला आहे? या योजनेत कोणाला गुंतवणूक करता येते? यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...
मोदींनी पोस्टाच्या ज्या योजनेत पैसे गुंतवले आहेत त्या योजनेचं नाव आहे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना म्हणजेच नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीम!
मोदींनी नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीममध्ये तब्बल 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. या योजनेमध्ये किमान पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.
सध्या मोदींनी गुंतवणूक केलेल्या पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीममधील गुंतवणुकीवर 7.7 टक्के व्याज मिळत आहे. तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये गुंतवणूक करुन दमदार परतावा मिळवू शकता. यात कशी गुंतवणूक करावी पाहूयात..
मोदींनी गुंतवणूक केलेल्या नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीममध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाला गुंतवणूक करता येते. यामध्ये जॉइण्ट अकाऊंट सुरु करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. दोन ते तीन जण एकत्रितपणे संयुक्त खातं सुरु करु शकतात.
लहान मुलांच्या नावाने आई-वडील केअर टेकर तसेच नॉमिनी राहून गुंतवणूक करु शकता. तसेच 10 वर्षांच्या मुलांच्या नावानेही नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक करता येते.
एकाच वेळी नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीममध्ये अनेक खाती सुरु करता येतात. यामध्ये किमान 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. कमाल गुंतवणूक किती असावी यावर कोणतीही मर्यादा नाही.
म्हणजेच मोदींनी गुंतवणूक केलेल्या नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीमअंतर्गत सर्वसामान्यांना कितीही पैसे गुंतवता येतात. या योजनेवर 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते.
पंतप्रधान मोदींनी पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीममध्ये 9 लाख 12 हजार रुपये गुंतवले आहेत. तुम्ही इतकी रक्कम गुंतवली तर पाच वर्षांच्या हिशोबाने व्याज म्हणून 4 लाख 9 हजार 519 रुपये मिळतील.
म्हणजेच मोदींप्रमाणे 9 लाख 12 हजार रुपये गुंतवले तर पाच वर्षानंतर 13 लाख 21 हजार 519 रुपये परत मिळतील.
जर पोस्टाच्या या योजनेमध्ये तुम्ही 9 लाखांची गुंतवणूक केली तर 5 वर्षानंतर त्यावर 4 लाख 4 हजार 130 रुपये व्याज मिळेल आणि एकूण 13 लाख 4 हजार 130 रुपये परत मिळतील.
1,00,000 लाखांच्या गुंतवणुकीवर 44,903 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षांनी 1,44,903 रुपये परत मिळतील. 2,00,000 लाखांच्या गुंतवणुकीवर 89,807 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षांनी 2,89,807 रुपये परत मिळतील. 3,00,000 लाखांच्या गुंतवणुकीवर 1,34,710 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षांनी 4,34,710 रुपये परत मिळतील. 4,00,000 लाखांच्या गुंतवणुकीवर 1,79,614 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षांनी 5,79,614 रुपये परत मिळतील. 5,00,000 लाखांच्या गुंतवणुकीवर 2,24,517 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षांनी 7,24,517 रुपये परत मिळतील.
Disclaimer: - आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा. येथे देण्यात आलेली माहिती सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.