PHOTOS

निसर्गाच्या कुशीत दडलेल्या स्वर्गीय ठिकाणी पोहोचले PM Modi; लगेच Google Search करा

PM Modi Kailash Darshan : आता हेच पंतप्रधान देशातील धार्मिक पर्यटनाचं महत्त्वं जाणत त्या दृष्टीनंही काही पावलं उचलताना दिसत आहेत. 

 

Advertisement
1/7
कुठंह ये ठिकाण?
कुठंह ये ठिकाण?

नुकतंच पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील कैलास व्ह्यू पॉईंटला भेट दिली. ज्यानंतर त्यांच्या या खास दौऱ्यातील अनेक फोटो समोर आले. 

2/7
स्थानिक पेहराव
स्थानिक पेहराव

स्थानिक पेहरावाला प्राधान्य देत पंतप्रधानांनीही यावेळी तसाच पेहराव केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी स्थानिकांनी उपस्थिती लावली. 

 

3/7
कपाळी भस्माचा टिळा
कपाळी भस्माचा टिळा

कपाळी भस्माचा टिळा आणि शुभ्र रंगाचा फेटा बांधून चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रेसह ते इथं पोहोचले. पंतप्रधानांच्या फोटोंतून उत्तराखंडमधील निसर्गही सर्वांसमक्ष आला. 

4/7
उत्तराखंड
उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये असणाऱ्या या ठिकाणहून अर्थात गुंजी गावातून पंतप्रधानांनी कैलास पर्वताचं दृश्य पाहिलं आणि त्यापुढं ध्यानधारणाही केली. 

5/7
पार्वती कुंड
पार्वती कुंड

पुढं पंतप्रधान पार्वती कुंड येथील मंदिरातही पोहोचले जिथं त्यांनी पूजाअर्चा केली. उत्तराखंमधील अनेक अद्वितीय ठिकाणांपैकीच हेसुद्धा एक.

 

6/7
गुगलवर शोधा ही ठिकाणं
गुगलवर शोधा ही ठिकाणं

गुगलवर (Google) शोधलं असता पार्वती कुंड आणि कैलास व्ह्यू पॉईंटबाबत बरीच माहिती तुम्हाला मिळते. आश्चर्य म्हणजे या व्ह्यू पॉईंटपासून कैलास पर्वत काही किमी दूर आहे. पण, तरीही तो पाहता येणं हा अनुभव आता पंतप्रधानांप्रमाणं तुम्हालाही घेता येणार आहे. 

 

7/7
या ठिकाणाला भेट देणार ना?
या ठिकाणाला भेट देणार ना?

पुढील दोन वर्षांमध्ये या ठिकाणांचा सर्वांगीण विकास होणार असून, धार्मिक पर्यटनस्थळी असणाऱ्या सुविधा इथं पुरवण्यात येतील. काय मग, तुम्ही या ठिकाणाला भेट देणार ना? 

 





Read More