उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू आणि त्यांच्या कुटुंबाने हैदराबादमध्ये आपल्या निवासस्थानी दिवाळी साजरी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसलमेरच्या लोंगेवाला पोस्टवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि त्यांच्या कुटुंबाने देखील दिवाळीनिमित्त दीप प्रज्वलित केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या कुटुंबासोबत शहिदांसाठी दिवा पेटवत दिवाळी साजरी केली.
भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी देखील उत्साहात दिवाळी साजरी केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्री गोरखनाथ मंदिर परिसरात स्थित आपल्या निवासस्थानी लक्ष्मी पूजन करुन दिवाळी साजरी केली. त्यांनी गणपती, कुबेर जी आणि लेखनी तसेच वहीचं पूजन केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत अक्षरधाम मंदिरमध्ये लक्ष्मी पूजन केले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या घरी पूजेमध्ये भाग घेतला.
आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुवाहाटी येथे दिवे पेटवत दिवाळी साजरी केली.
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील पाटागुडम पोलीस चौकीत जवानांसोबत दिवाळी साजरी केली.