Indian Celebrities Who Fail in 12th Class: तुमच्या आवडते अनेक बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटर बारावीत अनुत्तीर्ण होते किवा त्यांना जेमतेम गुण मिळाले होते. पण आज यशाच्या शिखरावर आहेत. तसेच करोडोची कमाईदेखील करतायत.
12th Fail Celibrity: महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. राज्याचा निकाल 91.88 टक्के लागलाय. यात काहीजण अनुत्तीर्ण झालेयत तर काहीजण जेमतेम गुण मिळाले म्हणून नाराज आहेत. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर जास्त लोड घेऊ नका.
कारण तुम्हाला पुन्हा परीक्षा देण्याची संधी आहे. तसेच बारावीचा निकाल म्हणजे तुमचं पूर्ण आयुष्य नव्हे. तुमच्या आवडते अनेक बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटर बारावीत अनुत्तीर्ण होते किवा त्यांना जेमतेम गुण मिळाले होते. पण आज यशाच्या शिखरावर आहेत. तसेच करोडोची कमाईदेखील करतायत.
आजच्या जगात शिक्षणाला फार महत्व आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी आणि योग्य आणि अयोग्य यात फरक करण्यासाठी वाचन आणि लेखन खूप महत्वाचे आहे. चित्रपट आणि प्रमोशनल इव्हेंट्स दरम्यान तुम्ही अनेकदा सेलिब्रिटींना अनेक प्रकारच्या गोष्टी बोलताना पाहिले असेल, कधी चांगल्या गोष्टी तर कधी खूप वाईट गोष्टी. हे सेलिब्रिटी किती सुशिक्षित आहेत हे लोकांना त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून किंवा कृतीवरून कळते, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही क्रिकेटर्स आणि बी-टाउनमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी बारावीही उत्तीर्ण केलेली नाही.
खासदार कंगना राणौत हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनयानंतर आता तिने राजकीय क्षेत्रात पदार्पण केलंय. पण खऱ्या आयुष्यात ती बारावीही उत्तीर्ण झालेली नाही. कंगनाला लहानपणापासूनच फॅशनमध्ये खूप रस होता. तिला मॉडेल किंवा अभिनेत्री व्हायचं होतं. पण कंगनाच्या आईवडिलांची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावं. ती तिच्या पालकांच्या सूचनेनुसार अभ्यास करत होती. पण ती बारावीत नापास झालीय. त्यानंतर ती घर सोडून दिल्लीला पळून गेली. आज कंगना करोडोंची मालकिण आहे.
बोनी कपूर यांचा लाडका मुलगा अर्जुन कपूरही बारावीच्या बोर्ड परीक्षेत नापास झाला. त्यानंतर त्याने शाळेत जाणे बंद केले. यानंतर अर्जुन कपूरने त्याच्या वडिलांना मदत करायला सुरुवात केली. आज अर्जुन एक यशस्वी अभिनेता आहे आणि भरपूर पैसे कमवत आहे.
90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या करिश्मा कपूरला कोण ओळखत नाही? आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना वेड लावणाऱ्या करिश्माने फक्त सहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. खरंतर, करिश्मा कपूरला लहानपणापासूनच अभ्यासात फारसा रस नव्हता. त्याचे लक्ष फक्त चित्रपटांमध्ये येण्यावर होते. याच कारणामुळे करिश्मा कपूरने सहावीनंतर तिचे शिक्षण सोडले.
तिच्या अभिनयासाठी देशभरात ओळखली जाणारी काजोलही बारावी पास नाही. काजोलने एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. 'बाजीगर' चित्रपटानंतर त्यांनी अभिनयात करिअर करण्यासाठी शाळा अर्ध्यावरच सोडली.
बॉलिवूडची बार्बी कतरिनाही बारावी पास नाही. खरंतर कतरिना लहान असताना तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिची आई एका संस्थेत सामील झाली ज्यासाठी ती अनेकदा एका देशातून दुसऱ्या देशात जात असे. त्यामुळे ती कधीच शाळेत गेली नाही. आईने तिच्यासाठी घरी एका शिक्षकाची व्यवस्था केली होती. वयाच्या 13-14 व्या वर्षी तिने मॉडेलिंग सुरू केले आणि शिक्षण सोडले. मॉडेलिंगनंतर तिने चित्रपटांमध्ये प्रवेश केला, त्यानंतर तिने तिचे शिक्षण सोडले. आज ती करोडोंची मालकिन आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर फक्त दहावी पास आहे. क्रिकेटमध्ये त्याने मिळवलेले यश पाहून कोणीही त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिले नाही. क्षमतेमुळे मार्कशीट मागे राहिली.
बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानने फक्त बारावी पर्यंत शिक्षण घेतलंय. पुढे शिक्षण घेण्याऐवजी तो अभिनयाकडे वळला आणि आज तो बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांमध्ये गणला जातो.
अॅपलची सुरुवात करणाऱ्या स्टीव्ह जॉब्सचे नाव अब्जाधीशांमध्ये समाविष्ट आहे. त्यांनी बारावीनंतर शिक्षण घेतले नाही. पण त्यांच्या समर्पणाचे आणि दिवसरात्र केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. कोणत्याही पदवीशिवाय ते सर्वात प्रसिद्ध मोबाईल कंपनी Apple चे संस्थापक बनले.