Maharashtra Dangerous Fort : महाराष्ट्र नाही तर देशातील सर्वात धोकादायक किल्ला तुम्ही पाहिला आहे का? धोकादायक असूनही दिसतो अतिशय सुंदर.
महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. मात्र, महाराष्ट्र नाही तर देशातील सर्वात धोकादायक किल्ला म्हणून ओळखला जाणारा किल्ला कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?
एका सरळ डोंगरावर दगड फोडून या किल्ल्यावर जाण्यासाठी वाट बनवण्यात आली आहे. या किल्ल्यावर जाणं हे अतिशय धोकादायक आहे.
यामुळेच महाराष्ट्रातील या किल्ल्याला भारतातील सर्वात धोकादायक किल्ल्यांपैकी एक म्हटलं जातं. हा किल्ला प्रबळगड किल्ला म्हणून ओळखला जातो.
महाराष्ट्रातील माथेरान आणि पनवेल दरम्यान हा किल्ला आहे. हा किल्ला कलावंती किल्ला तसेच कलावंतीण दुर्ग या नावानं प्रसिद्ध आहे.
2300 फूट उंच टेकडीवर असणाऱ्या या किल्ल्यावर कमी लोक येतात आणि सूर्यास्तापूर्वी गड उतरतात. खडक फोडून या किल्ल्यावर दगडी पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत.
या दगडी पायऱ्यांवर दोऱ्या किंवा रेलिंग नाही. त्यामुळे हा सरळ किल्ला चढणं फार कठीण आहे. त्यामुळे हा किल्ला चढताना एखादी चूक खूप महागात पडू शकते.
त्यामुळे पाय घसरल्यास खाली थेट खोल दरी आहे. या किल्ल्यावर जाताना अनेकांचा पाय घसरल्यामुळे मृत्यूही झाला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे.
हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर असून पश्चिम घाटातील हा एक भव्य किल्ला आहे.