PHOTOS

PHOTO : नयनताराच्या प्रेमासाठी मोडला 16 वर्षांचा संसार, Salman Khan च्या कारकिर्दीला दिली नवीन उंची, 50 व्या वर्षी चौथ्यांदा बाबा

Birthday Special : विवाहित असूनही अभिनेत्री नयनताराच्या प्रेमात पडला होता हा अभिनेता. तर आता वयाच्या 50 व्या वर्षी चौथ्यांदा वडील झाला. दुसऱ्या पत्नीने गेल्या वर्षी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 

 

Advertisement
1/8

हा चिमुकला आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर दिग्दर्शक आहे. हा चिमुकला उत्कृष्ट नृत्यांगनाच नाही तर एक अप्रतिम अभिनेता, दिग्दर्शकदेखील आहे. 

2/8

बॉलिवूडमध्ये या चिमुकल्याला मायकल जॅक्सन असं म्हटलं जातं. आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत तुम्हाला कळलं असेल.  प्रभू देवा यांचा आज वाढदिवस आहे. 

3/8

प्रभू देवाने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन त्यानंतर 2009 मध्ये वॉन्टेड या चित्रपटातून दिग्दर्शकच्या दुनियात पाय ठेवला. या चित्रपटाने सलमान खानच्या करिअरला नवीन उंची दिली. 

4/8

अविवाहित असून प्रभूदेवा अभिनेत्री नयनताराच्या प्रेमात पडले होते. ते दोघे एकत्र राहत होते. प्रभूदेवाच्या पहिली पत्नी रामलता यांना या अफेयरबद्दल कळलं. त्यानंतर त्यांनी 16 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम लावला. 

5/8

रामलता आणि प्रभूदेवा यांना तीन मुलं होती. त्यातील एका मुलाचा 2008 मध्ये कर्करोगामुळे मृत्यू झाला. घटस्फोटानंतर प्रभूदेवाची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. 

6/8

मीडिया रिपोर्टनुसार असं म्हटलं जातं की,  प्रभूदेवासोबत लग्न करण्यासाठी नयनतारा हिने धर्म बदलला होता. पण काही कारणामुळे प्रभूदेवा आणि नयनतारा यांचा ब्रेकअप झाला. 

7/8

नयनतारानंतर प्रभूदेवाने 2020 मध्ये हिमानीसोबत गुप्तपणे लग्न केलं. हिमानी सिंग ही डॉक्टर असून त्यांना दोन मुलं आहेत. 

8/8

प्रभूदेवा हे शास्त्रीय नृत्यांगना असून त्यांनी भरतनाटयचे धडे गिरवले आहेत. त्यांचे वडील इंडस्ट्रीमध्ये कोरिओग्राफर होते. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं. 





Read More