PHOTOS

निसर्गाच्या सानिध्यात स्विमिंग पूल, 15 जणांची सोय,प्राजक्ताचं लक्झरी फार्महाऊस, एका दिवसाचे भाडे फक्त...

पावसाळ्यात तुम्हाला देखील कर्जत या ठिकाणी मित्र-मैत्रिणींसोबत निसर्गाच्या सानिध्यात फार्महाऊसवर राहायचं असेल तर प्राजक्ता माळीचे फार्महाऊस आहे एकदम खास. 

Advertisement
1/8

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने कर्जतमध्ये काही महिन्यांपूर्वी एक आलिशान फार्महाऊस खरेदी केलं आहे. 

2/8

कर्जतमधील या फार्महाऊसचे नाव देखील अभिनेत्रीने 'प्राजक्तकुंज' असं ठेवलं आहे. तिच्या या फार्महाऊसचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या सविस्तर 

3/8

जर तुम्हाला देखील सुट्टीच्या दिवशी कर्जतमध्ये फार्महाऊसवर जाऊन मित्र-मैत्रिणींसोबत मज्जा करायची असेल तर प्राजक्ता माळीच्या निसर्ग रम्य वातावरणात असणाऱ्या फार्महाऊसला भेट द्या. 

4/8

प्राजक्ता माळीच्या या फार्महाऊचा लूक आणि तेथील लायटिंग आणि परिसर हा पर्यटकांना भूरळ घालणारा आहे. मोठ्या खोल्या, स्विमिंग पूल, आकर्षक फर्निचर अशा अनेक सुविधा तिथे आहेत. 

5/8

अभिनेत्रीने तिचा हा व्हिला 'द ग्रीन मोन्टाना' नावाने एका कंपनीकडे रजिस्टर केला आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिला बुकिंग करून तिथे राहू शकता. तेथील निसर्गाचा आनंद घेऊ शकता. 

6/8

 जर तुम्हाला या ठिकाणी राहायचं असेल तर तुम्हाला  वीकेंडला शनिवार-रविवार एका दिवासाला 30 हजार रुपये भाडे आहे. तर सोमवार ते शुक्रवारदरम्यान एका दिवसासाठी 17 त 20 हजार भाडे आहे. 

 

7/8

प्राजक्ता माळीच्या या व्हिलामध्ये एकूण 15 जण राहू शकतात. यामध्ये तुम्हाला किचन, ओव्हन, गॅस, स्विमिंग पूल, गार्डनर अशा अनेक सुविधा तिथे मिळतात.

8/8

मात्र, पर्यटकांना तिथे जेवण बनवता येणार नाही. त्यांनी आणलेलं जेवण गरम करता येईल. तसेच पाळीव प्राणी घेऊन येण्यास मनाई आहे. तिथे असणाऱ्या हॉटेलमधून तुम्ही जेवण मागवू शकता.  





Read More