Prajakta Mali Gudi Padwa 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपुरातील गुढीपाडव्या निमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी झाली होती. हिरवी साडी, नाकात नथ अन्...तिचा हा मराठमोळा लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
गुढीपाडव्याचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. घरोघरी विजयाची गुढी उभारण्यात आली आहे.
शहरांमध्ये गुढी पाडव्यानिमित्त शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण, गिरगाव, ठाणे, डोंबिवली, पुणे आणि नाशिकमध्ये आकर्षित अशा शोभा यात्रा काढण्यात आल्या होत्या.
नागपुरातील तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सहभाग नोंदवला.
हिरवी साडी, नाकात नथ, मराठी साज अशी पारंपरिक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
यावेळी प्राजक्ता माळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसून रामरक्षाही म्हटली. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्राजक्ता माळी गेल्या काही महिन्यांपासून अनेक राजकीय नेत्यांची भेटीगाठी घेताना दिसून आली आहे. त्यामुळे प्राजक्ता राजकारणात येणार का अशी चर्चा रंगली आहे.
चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. 1 जानेवारी ही नवीन वर्षाची सुरुवात नाही, तो एका राजाचा वाढदिवस आहे, असं प्राजक्ता माळी म्हणाली.