मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने नॉनव्हेज खाणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला होता. नेमकं काय म्हणाली प्राजक्ता?
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमी तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने चर्चेत असते. प्राजक्ता माळी आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
अनेक कलाकार हे त्यांच्या चाहत्यांसोबत डाएटबाबत माहिती शेअर करत असतात. अशातच प्राजक्ता माळी नॉनव्हेज का खात नाही हे तुम्हाला माहिती आहे का?
अशातच तिने एका मुलाखतीत ती मांसाहारला का स्पर्श करत नाही. याबद्दल खुलासा केला आहे. तिचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
ज्यामध्ये प्राजक्ता माळीने तिच्या चाहत्यांना नॉनव्हेज खाण्यासंदर्भात सल्ला देखील दिला होता. तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता माळीने सांगितले की, मी दोन गोष्टी पाळते, एक म्हणजे उत्तम खाणं आणि दुसरं उत्तम दिनचर्या.
तसेच जे तुम्ही अन्न खाता त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. कारण नॉनव्हेज पचवण्यासाठी शरीराला तब्बल 72 तास लागतात.
माणसाची आणि प्राण्यांची पचन संस्था वेगळी असते. त्यामुळे मला वाटतं की नॉनव्हेज हे माणसांसाठी बनलेलं नाही असं प्राजक्ता म्हणालेली.
पुढे प्राजक्ता म्हणाली की, ती आधी नॉनव्हेज खायची मात्र, त्यानंतर तिने ते खाणे सोडून दिलं. त्यानंतर मी फक्त मातीत पिकतात तेच खाते असं म्हणाली.