आई ही मुलांची पहिली गुरु का मानली जाते. प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं यामागचे कारण. जाणून घ्या सविस्तर
...प्रेमानंद महाराज म्हणतात की, आईच तिच्या मुलांची पहिली गुरु असते. प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं मुख्य कारण.
जेव्हा एखादे मूल जन्माला येते तेव्हा ते सर्वात प्रथम आपल्या आईला पाहते. आईची मांडी ही त्या मुलाची पहिली शाळा असते.
मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठा धडा येथूनच सुरु होतो. आई फक्त शरीराचे पोषण करत नाही तर त्याच्या मनाला देखील मार्गदर्शन करते.
प्रेमानंद महाराजांच्या मते, आई मुलाला नऊ महिने पोटात ठेवते आणि असह्य वेदना सहन करते. त्याचबरोबर बाळंतपणानंतरही ती तिच्या रक्ताचे दुधात रुपांतर करते आणि अनेक वर्षे बाळाला दूध पाजते.
फक्त आईच मुलाला जीवन जगण्याचे खरे शिक्षण देते. ती तिच्या प्रेमाने, आपुलकीने आणि सुरक्षिततेने मुलाच्या आत भावना जागृत करते.
मुलाच्या आयुष्यातील पहिला धडा हा प्रेम, त्याग आणि निस्वार्थ सेवेचा असतो. आईचे वर्तन हे मुलासाठी सर्वात मोठा धडा आहे.
आई ही मुलांचा पाया रचणारी पहिली गुरु आहे. जर आई सकाळी उठून भजन गायली, तर मुलही तेच करतील.
जगातील सर्वात आदरणीय आणि सर्वोत्तम व्यक्ती म्हणजे आई. जर तुम्ही रोज आईची सेवा केली तर तुम्ही देवाला प्रसन्न कराल.