Premier Padmini taxis:मुंबईतील लोकांचा या टॅक्सी सेवेशी अतूट संबंध असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा प्रवास संपणार आहे. नवीन मॉडेल आणि अॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती.
सोमवारपासून मुंबईत रस्त्यावर धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी बंद होणार आहे. गेली 60 वर्षे मुंबईच्या रस्त्यावर ही काळी पिवळी धावत होती.
प्रीमिअर पद्मिनी कंपनी बंद झाली असून आता मात्र सोमवार पासून ह्या टॅक्सीचे मीटर डाऊन होणार आहे.
पद्मिनी टॅक्सित ऐसपैस जागा ,स्टेअरिंगला गियर, समोरून आणि मागून सुरक्षित असलेली ही टॅक्सी बंद होत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतसुद्धा या टॅक्सीने मानाचे स्थान मिळवले होते.
मुंबईतील लोकांचा या टॅक्सी सेवेशी अतूट संबंध असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा प्रवास संपणार आहे.
नवीन मॉडेल आणि अॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत.
शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी ताडदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती.
मुंबईत कॅब चालवण्याची कालमर्यादा 20 वर्षे आहे. त्यामुळे सोमवारपासून 'प्रीमियर पद्मिनी' टॅक्सी अधिकृतपणे मुंबईत धावणार नाही.
'ही मुंबईची आणि आमच्या आयुष्याची शान आहे.' असे मुंबईच्या शेवटच्या नोंदणीकृत प्रीमियर पद्मिनी टॅक्सी (MH-01-JA-2556) च्या मालक प्रभादेवी म्हणाल्या.
किमान एक प्रीमियर पद्मिनी रस्त्यावर किंवा संग्रहालयात जतन करावी, अशी मागणी काही लोकांनी केली आहे.
मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने सरकारला किमान एक काळी-पिवळी टॅक्सी टिकवून ठेवण्याची विनंती केली होती, पण त्यात यश आले नाही.