गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत नसलेल्या पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत दमदार कामगिरी केली आहे.
IPL 2025 च्या मेगा लिलावात विकला न गेलेला स्टार भारतीय खेळाडू पृथ्वी शॉच्या बॅटिंगने कहर केला आहे. पृथ्वी शॉने अवघ्या 9 चेंडूत 44 धावा केल्या.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विदर्भाविरुद्ध पृथ्वी शॉच्या बॅटने दमदार कामगिरी केली आहे.
प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने 20 षटकांत 6 गडी गमावून 221 धावा केल्या. त्यानंतर पृथ्वी शॉने 26 चेंडूत 49 धावांची खेळी केली.
यावेळी पृथ्वी शॉने 4 षटकार आणि 5 चौकार लावले. याआधी देखील त्याने नागालँडविरुद्ध 29 चेंडूत 40 धावा केल्या होत्या.
IPL 2025 च्या मेगा ऑक्शनात 10 संघांनी एकूण 182 खेळाडूंना 639.15 कोटी रुपयांना खरेदी केले.
पृथ्वी शॉ हा 75 लाख रुपयांच्या किंमतीसह लिलावात उतरला होता. परंतु, त्याला सततच्या अपयशामुळे कोणत्याही संघाने घेतले नाही.
गेल्या वेळी दिल्ली कैपिटल्समधून खेळणाऱ्या पृथ्वी शॉला यावेळी कोणीही विकत घेतले नाही. तो फिटनेसच्या समस्यांमुळे बाहेर पडला.