PHOTOS

'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा

Priya Bapat and Umesh Kamat: प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीची कायमच चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्या दोघांची जोराच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सध्या त्यांचा एक रोमॅण्टिक किस्सा व्हायरल झाला आहे, तुम्ही ऐकलात का तो? 

Advertisement
1/7
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा

सध्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांचे जर तरची गोष्ट हे नाटक तुफान गाजते आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. 

2/7
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा

5 ऑगस्ट रोजी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यानंतर या नाटकाची जोरात चर्चा आहे. यात आशुतोष गोखले, पल्लवी अजय, उमेश कामत आणि प्रिया बापटची प्रमुख भुमिका आहे. 

3/7
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा

यावेळी रेड एफला दिलेल्ल्या एका मुलाखतीत प्रियानं उमेशचा एक किस्सा सांगितला आहे. यावेळी हा मजेदार किस्सा सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे. 

4/7
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा

ती म्हणाली की, ''उमेशला मी अनेकदा तू प्रेम व्यक्त करत नाहीस असं बोलायचे. त्यामुळे एकदा मॉलमध्ये आम्ही सरकत्या जिन्यावरून वरच्या माळ्यावर जात होतो. त्यावेळी सगळेजण माझ्याकडेच पाहत होते. त्यांना माझा फोटो काढू की व्हिडीओ हे कळत नव्हतं.''

5/7
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा

पुढे ती म्हणाली की, '' तेव्हा उमेशने अचानक 'काय गं माझी बायको' असं बोलून माझा हात हातात घेतला. सगळेजण आमच्याकडे बघत होते. मी त्याला म्हणाले, 'अरे! थांब! लोक व्हिडीओ काढतील पण उमेशचं म्हणणं होतं 'काढू देत तुला वाटतं ना, मी प्रेम व्यक्त नाही करत म्हणून केलं'.”

6/7
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा

प्रिया बापट आणि उमेश कामत यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. ते दोघं सोशल मीडियावरही फोटो शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

7/7
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा
'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा

प्रिया आणि उमेशनं 2011 साली लग्न केले. त्यांच्या लव्ह अफेअरची तेव्हाही जोरात चर्चा होती. सध्या ते एकत्र अनेक प्रोजेक्ट्समधून एकत्र दिसत आहेत. 

Read More