प्रियंका २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमानंतर हिंदी सिनेमातून गायब झालीय. सध्या ती हॉलिवूड सिनेमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसतेय
नवी दिल्ली : भावाचा आयोजित विवाह रद्द झाल्यानंतर आता पुन्हा एकदा प्रियंका चोप्रा भारतात परतलीय.
मायदेशात दाखल झाल्या-झाल्या प्रियांका पुन्हा एकदा कामाला लागलीय. प्रियंका बुधवारी रात्री भारतात दाखल झाली.
गुरुवारी रात्री ती तिचा आगामी 'द स्काय इज पिंक' या हिंदी सिनेमाच्या प्रोड्युसरच्या अर्थात आदित्य रॉय कपूरच्या घरी दाखल झाली.
या भेटीनंतर आदित्य रॉय कपूरदेखील खूपच आनंदी दिसत होते
प्रियंकासोबत यावेळी तिची आईदेखील उपस्थित होती
यावेळी प्रियंकानं ऑलिव्ह ग्रीन रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अर्थातच नेहमीप्रमाणे हा रंगदेखील तिला खुलून दिसत होता.
'द स्काय इज पिंक' या सिनेमात प्रियंका वेगवेगळ्या वयांच्या भूमिकेत दिसणार आहे.
भारतात परतल्यानंतर प्रियंका आपल्या आगामी सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदारपणे पुन्हा एकदा दाखल होणार असं दिसतंय.