Happy Propose Day : 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा करण्यात येणार आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. पण तुम्हाला काय बोलायचं सुचत नाही, किंवा शब्दात प्रेम व्यक्त करता येत नाही. तर तुमच्यासाठी या खास मराठीतून शुभेच्छा, नक्की कामी येईल.
आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय एकटेपणात तुझी सोबत हवीय आनंदाने भरलेल्या या आयुष्यात प्रेम फक्त तुझंच हवंय हॅपी प्रपोज डे
समुद्राचं किनाऱ्याशी... ढगांचं आभाळाशी… मातीचे जमिनीशी.. तसंच अतुट नाते आहे… माझे केवळ तुझ्याशीच... हॅपी प्रपोज डे
ओढ लागलीया तुला मिळवायची, तु मला संजुन घेशील का? लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का थांबव आता खेळ स्वप्नांचा, कायमची माझी होशील का हॅपी प्रपोड डे
तुला जिंकून घेण्याचे मला लागलेय आहे वेड, मला समजून घेशील ना? तुझ्या प्रेमाची मला लागलीये ओढ, साथ मला देशील ना? Happy Propose Day !
कुणीतरी राहावं आपल्या हृदयात असं तुलाही वाटत असेलच ना? मी तर तुझी निवड केली, तुही माझी निवड करशील ना? Happy Propose Day !
हातात असावा फक्त तुझाच हात, तुझी मिळावी आयुष्यभराची साथ…देवाने बांधली आपली गाठ, कोणी करू नये आपल्या प्रेमावर मात… Happy Propose Day !
मला पुढचा जन्म मिळाला तर त्या जन्मातही मला तुझेच व्हायचे आहे. पुढच्या शंभर जन्मांसाठी तुला आत्ताच प्रपोज करतो /करते आहे. माझं प्रपोझल स्वीकारशील ना? Happy Propose Day !