णेकरांसाठी मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतुकीचा आणखी एक पर्याय खुला झाला आहे. त्यामुळं शहरातील वाह...
पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहे. कोणती आहेत ती स्थानके पाहूयात.
पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नाव बदलण्याची प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या स्थानकांची नावं बदलण्यात येणार आहेत. तसा प्रस्तावदेखील केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
बुधवार पेठ मेट्रो स्टेशनचे नाव कसबा पेठ मेट्रो स्टेशन करण्यात येणार आहे.
मंगळवार पेठ स्टेशनचे नाव बदलून आरटीओ मेट्रो स्टेशन होणार आहे.
नाशिक फाटा स्थानकाचे नाव बदलून कासारवाडी मेट्रो स्टेशन करण्यात येणार आहे
सिव्हिल कोर्ट स्थानकाचे नाव बदलून शिवाजीनगर जिल्हा न्यायालय करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे