PHOTOS

गेमिंग रुम, शूजसाठी कपाट अन्... प्रत्येकाला 'ड्रीम होम' वाटेल असं आहे Shreyas Iyer चं मुंबईतलं घर! किंमत तब्बल...

Shreyas Iyer Luxury Home Inside Photos: श्रेयस मुंबईमधील एका नामांकित इमारतीमध्ये वास्तव्यास असून त्याचं घर 48 व्या मजल्यावर आहे. त्याच्या घरातील फोटो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल...

Advertisement
1/20

श्रेयस अय्यरच्या घरातील फोटो पाहून कोणत्याही तरुणाला हे त्याच्या स्वप्नातील घर आहे म्हणजेच ड्रीम होम आहे असं नक्की वाटेल. पाहूयात श्रेयसच्या घरात नेमकं काय काय आहे आणि तो मुंबईतील कोणत्या इमारतीत राहतो. तसेच त्याच्या घराची किंमत किती आहे आणि त्याची एकूण संपत्ती किती हे ही पाहूयात...

2/20

आपल्या क्रिकेट कौशल्यामुळे मागील काही वर्षांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेला क्रिकेटपटू म्हणजे श्रेयस अय्यर..... 

3/20

दिल्लीला आयपीएलच्या फायनलपर्यंत पोहचवणारा, कोलकात्याला तिसऱ्यांचा आयपीएलचा चषक जिंकून देणारा आणि 2025 मध्ये पंजाबला आयपीएल फायनलपर्यंत पोहचवणारा श्रेयस हा मुंबईमधील एका आलिशान इमारतीमध्ये राहतो.

 

4/20

श्रेयसने 2020 मध्ये खरेदी केलेला हा 4 बीएचकेचा फ्लॅट 48 व्या मजल्यावर आहे. इथून मुंबई शहराचं आणि समोरच्या अरबी समुद्राचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं.

 

5/20

श्रेयस अय्यरचे घर मुंबईतील मध्यभागी भाग असलेल्या लोअर परळमध्ये आहे. सेलिब्रिटींबरोबरच श्रीमंत व्यक्तींकडून सर्वाधिक मागणी असलेला हा परिसर आहे. 

 

6/20

श्रेयसचे घर हे केवळ मुंबईत मौक्याच्या ठिकाणी आहे असं नाही तर अनेक सेलिब्रिटीही त्याच्या या घरापासून हाकेच्या अंतरावर राहतात. श्रेयसच्या घरापासून  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे घर अगदी थोड्या अंतरावर आहे.

 

7/20

श्रेयसच्या घरात एक खास गेमिंग रुमही आहे. या गेमिंग रुममध्ये मोठी स्क्रीन, गेमिंग कन्सोल, स्पीकर अशा बऱ्याच गोष्टी आहेत.

 

8/20

मोठा बेड, वॉक इन वॉर्डरोब, मोठ्या खिकड्या असा श्रेयसचा प्रशस्त बेडरुम आहे.

 

9/20

श्रेयसचं हे घर 2618 चौरस फूट एरिया असलेलं आहे. श्रेयस त्याचे आई-वडील आणि बहिणीसोबत या घरामध्ये राहतो.

 

10/20

श्रेयस अय्यरचे डिझाइनही फार सुंदर आहे. स्वच्छ रेखाटन आणि मिडल टोन कलर्समध्ये घरातील इंटिरिअरची रंगसंगती आहे.

 

11/20

मॉडर्न डिझाइनमुळे श्रेयसच्या घराच्या सौंदर्यात भर तर पडतेच पण ते अधिक स्टायलिश वाटते.

 

12/20

घरात वूड फ्लोअर आणि वापरलेल्या रंगांमुळे घर अधिक उबदार आणि सोबर दिसतं. घरातील फर्निचरही लक्ष वेधून घेणारं आहे.

 

13/20

श्रेयसच्या या घरामध्ये प्रशस्त खासगी जीमही आहे. 

 

14/20

श्रेयसच्या घरातील खासगी जीममध्ये बरंच व्यायामाचं साहित्य आणि इतर आधुनिक उपकरणे आहेत.

 

15/20

घरातील एका भागात श्रेयसने खास बुटांच्या कलेक्शनसाठी कपाटं तयार करुन घेतली आहेत. 

 

16/20

अनेक महागडे बुटांचे जोड श्रेयसच्या कलेक्शनमध्ये आहेत. त्यात प्युमा, नाईके, आदिदास यासारख्या ब्रॅण्डसच्या बुटांचा समावेश आहे.

 

17/20

श्रेयस अय्यर मुंबईतील लोअर परळ येथे असलेल्या लोढा वर्ल्ड टॉवर्समधील आलिशान घरात राहतो. त्याचे घर हे लक्झरी हाऊस कशाला म्हणतात याचं एक उत्तम उदाहरण आहे.

 

18/20

श्रेयस अय्यर ज्या 4 बीएचके फ्लॅटमध्ये राहतो त्याची किंमत 12 कोटी रुपये इतकी आहे.  त्याने केवळ 25 लाखांची स्टॅम्प ड्युटी या घरासाठी भरली आहे. 

 

19/20

2025 च्या आकडेवारीनुसार श्रेयसची एकूण संपत्ती 58 कोटी रुपये इतकी आहे. 

20/20

श्रेयसकडे Mercedes-Benz G63 AMG आणि Lamborghini Huracan यासारख्या आलिशान कार्सही आहेत.





Read More