IPL 2025 mega auction : आगामी आयपीएल हंगामाआधी फ्रँचायझींसमोर मोठं आव्हान आहे. मोजक्याच खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. अशातच आता पंजाब किंग्जच्या निर्णयावर सर्वाचं लक्ष लागलंय. तर शिखर धवनचं काय होणार? असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे.
पंजाब किंग्जच्या सोशल मीडियावर असलेल्या कवर फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे. यामधून पंजाब किंग्जने संकेत दिलेत का? असा सवाल विचारला जातोय.
पंजाब किंग्जच्या कवर फोटोमध्ये सॅम करन, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, शशांक सिंग आणि कागिसो रबाडा हे खेळाडू एका बाजूला दिसतायेत.
तर शिखर धवनसह इतर खेळाडू दुसऱ्या बाजूला दिसत आहेत. त्यामुळे पंजाब किंग्ज कवर फोटोमधील 5 खेळाडूंना रिटेन करणार, अशी चर्चा होताना दिसत आहे.
शिखर धवन गेल्या दोन हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व करत होता. मात्र, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने तो आयपीएल खेळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
त्यामुळे आता शिखर धवन आयपीएल खेळणार नसेल तर पंजाब किंग्जला नवा कॅप्टनला शोधण्याची मोहिम हाती घ्यावी लागणार आहे. पंजाब संघ रोहित शर्मासाठी इच्छुक असल्याचं समोर आलं होतं.